Maharashtra

? प्रेरणादायी…अमेरिकेचे अध्यक्ष गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविणारे अब्राहम लिंकन यांच्या जन्मदिनी खास अभिवादन…..

? प्रेरणादायी…अमेरिकेचे अध्यक्ष गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविणारे अब्राहम लिंकन यांच्या जन्मदिनी खास अभिवादन…..

संकलन प्रा जयश्री दाभाडे

अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16 वे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म आज म्हणजेच 12 फेब्रुवारी 1809 रोजी एका गरीब कुटुंबात झाला. लिंकन यांना आधुनिक काळातील एक महान व्यक्ती मानले जाते.

महान व्यक्ती मानण्याचे दोन कारणे आहेत. पहिले- लिंकन यांचे स्वत:चे धैर्य आणि परिश्रम. वारंवार अपयशी ठरल्यानंतरही गरीब घरात जन्मलेल्या मुलाची अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी नेमणूक झाली.

दुसरे कारण म्हणजेच त्यांनी अमेरिकेत गुलामगिरीचे कायदेशीररित्या उच्चाटन केले, आणि कोट्यावधी लोकांना मानवी हक्क दिले.

अब्राहम लिंकन यांचा जन्म 12 फेब्रुवारी1809 केंटकी राज्यातील एका लहान गावात लाकडी खोपट्यात झाला. हा त्यांचे नाव त्यांच्या आजोबांवरून ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील थॉमस लिंकन व आई नॅन्सी हे दोघेही निरक्षर शेतकरी होते. जरी नंतरच्या काळात लिंकनच्या लहानपणच्या गरिबीचे व कठीण परिस्थितीचे बरेच वर्णन झाले असले तरी वस्तुतः त्यांचे वडील ते त्या भागतील श्रीमंत नागरिक होते. त्यांनी ३४८ एकराचा सिंकिंग स्प्रिंग फार्म डिसेंबर १८०८ मध्ये २०० डॉलरला विकत घेतला होता. आता ही जागा एक राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केली गेली आहे. त्यांचे वडील मुख्य बाप्टिस्ट चर्चमधून गुलामगिरीला असलेल्या विरोधामुळे वेगळे झालेल्या अशा एका बस्तीस्ट चर्च चे सदस्य होते. त्यामुळे अब्राहम लिंकनला लहानपणापासूनच गुलामगिरीच्या विरोधाचे बाळकडू मिळाले होते. ते स्वतः मात्र वडिलांच्या अथवा इतर कोणत्याच चर्चचा सदस्य झाले नाही.

बरीच स्थलांतरे केल्या नंतर अखेर 1816 मध्ये , लिंकन सात वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब इंडियानामध्ये गेले. लिंकनने या मागे आर्थिक परिस्थिती व केंटकीमधील गुलामगिरीची पद्धत अशी दोन कारणे होती.

आणखी आर्थिक व जमिनीशी निगडित अडचणींनंतर 1830 मध्ये लिंकन कुटुंबीयांनी पुन्हा एकदा स्थलांतर केले. पुढील वर्षी बावीस वर्षाच्या लिंकनने स्वबळावर जगण्याचे ठरविले व डेंटन ओफुट या व्यापार्‍यासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे काम न्यु सेलम ते न्यु औरलियन्स येथे बोटीने माल वाहून नेण्याचे होते. असे मानले जाते की या काळात त्यांनी ऑर्लिअन्स येथे गुलांमांचा लिलाव पाहिला व ही घटना त्यांच्या मनात आयुष्यभर घर करून राहिली.

? प्रेरणादायी...अमेरिकेचे अध्यक्ष गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविणारे अब्राहम लिंकन यांच्या जन्मदिनी खास अभिवादन.....

त्यांच्या बद्दलच्या काही महत्वपूर्ण बाबी

1) अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे दीर्घकाळ काम करणारे अध्यक्ष राहिले आहेत. त्याची उंची 6 फूट 4 इंच उंच होती.

2) 12 फेब्रुवारी 1809 हा इतिहासातील एक अत्यंत दुर्मिळ दिवस आहे. या दिवशी चार्ल्स डार्विन आणि अब्राहम लिंकन दोघांचा जन्म झाला.

3) लिंकन 9 वर्षांचे असताना विषारी दूध पिल्याने त्याच्या आईचे निधन झाले. नंतर त्याच्या वडिलांनी पुन्हा लग्न केले.

4) पेटंट मिळविणारे अब्राहम लिंकन हे एकमेव अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. त्यांना यांत्रिक अडचणींमध्ये आणि संशोधनात रस होता.

5) लिंकन यांनी वकिलीचा व्यवसाय स्वीकारला होता. यासाठी त्यांनी कोणतीही पदवी मिळविली नव्हती, तर त्यांनी वकिलीच्या विषयाचा स्वत:अभ्यास केला होता.

6) लिंकन 21 व्या वर्षी निवडणूक हरले, 22 व्या वर्षी लग्न करण्यात अपयशी ठरले, 27 व्या वर्षी पत्नीचा घटस्फोट झाला, 32, 37, 42, 47 व्या वर्षी निवडणुकीत पराभूत झाले. वयाच्या 52 व्या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष झाले.

7) लिंकन यांनी सत्ता स्वीकारल्यानंतर अमेरिकेत गृहयुद्धात 6 दशलक्षाहून अधिक लोक मरण पावले. हे गृहयुद्ध लिंकन यांना शांत करण्यात यश आले.

8) बराक ओबामा लिंकनचा खूप आदर करतात, म्हणून अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यापूर्वी लिंकन यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली त्या ठिकाणी ते गेले.

9) लिंकन एकदा म्हणाले होते, “जेव्हा मी काहीतरी करतो तेव्हा मला चांगले वाटते आणि जेव्हा मी वाईट करतो तेव्हा मला वाईट वाटते. हा माझा धर्म आहे.”

10) 1842 मध्ये, लिंकन यांनी जेम्स शिल्ड्स नावाच्या गर्विष्ठ आणि काटेकोर राजकारण्यावर एक व्यंग्य लिहिले, ज्यामुळे जेम्स शिल्ड्सवर संपूर्ण शहर हसले होते.

11) खाण्याकरिता देखील प्राणी मारण्याची कल्पना त्याना पसंत नसल्याने त्यांनी शिकार व मासेमारी यातही कधी रस घेतला नाही. त्यांची शरीरयष्टी मजबूत व उंची भरपूर असून ते उत्तम दर्जाचा लाकूडतोड्या व कुस्तीपटू होते.

12) अतिशय साधी अशी वक्तृत्व शैली कमावली. या भाषाशैलीमुळे अवघड भाषेतील भाषणे ऐकण्याची सवय असलेल्या श्रोत्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसत असे.

13) अब्राहाम लिंकन त्यांच्या अनोख्या लिखाणा बद्दल ,आयुष्याच्या अनुभवावर त्यांच्या कोट्स बद्दल प्रसिद्ध आहेत.

? प्रेरणादायी...अमेरिकेचे अध्यक्ष गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविणारे अब्राहम लिंकन यांच्या जन्मदिनी खास अभिवादन.....
अब्राहम लिंकन १४ एप्रिल १८६५ रोजी वॉशिंग्टन येथील फोर्ड्स थिएटरमध्ये ‘अवर अमेरिकन कझिन’ नावाचे नाटक पाहण्यास गेले होते. तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागील बाजूने जॉन बिल्वस नावाच्या अभिनेत्याने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले. अचानक झालेल्या कल्लोळात बूथने लिंकन यांच्या सहकाऱ्यावर चाकूने वार केला आणि गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. त्यात त्याच्या घोटय़ाचे हाड मोडले. तरी तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढे बारा दिवसांत पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ठार मारले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button