हिगोंणे खुर्द प्र.ज.येथे लोक सहभागातून आर.ओं.प्लंन्ट सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील
हिंगोणे खुर्द प्र.ज हे गांव तापी नदीच्या किनाऱ्यावर असुनही दुषित बॅक वॉटर व जमिनीतील खा-या पाण्यामुळे गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचे अनेक वर्षांपासून बेहाल होते.हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता व याबाबत ग्रामपंचायतीने आतापर्यंत कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे गावच्या ग्रामपंचायत सदस्य व भाजप ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. दिव्या उल्हास मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली गावक-यांनी लोकसहभागातून आर.ओं.प्लँन्ट उभारणी करण्याचे ठरविले व एक महिन्याच्या अथक परिश्रमानंतर सदर आर.ओं.प्लँन्टचे उद्घाटन सौ. दिव्या उल्हास मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रकल्प उभारणीसाठी प्रविण पाटील (भटु), अविनाश कोळी, महेन्द्र ठाकरे, देवराम काका यांनी अथक परिश्रम घेत प्रकल्प यशस्वी केला.
याप्रसंगी किरण मराठे, उल्हास मराठे, अँड. चंद्रकांत भदाणे, सुनिल आण्णा, सुरेश नामदेव कोळी, विजय मधुकर पाटील, वासुदेव कोळी, मधुकर किसन कोळी, प्रकाश कोळी, पदम बैसाणे , सौ. आशाताईं भिल व सर्व ग्रामपंचायत सदस्य, मोतिलाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राकेश पाटील, शिवाजी भाऊ, मुरा आप्पा,शांताराम कोळी, प्रकाश कोळी, भागवत कोळी व अनेक महिला उपस्थित होते.








