Maharashtra

न्हावीमध्ये नागरिकांची कोरोना विषाणूंचा तपासणी सुरू  ग्रामस्थांमध्ये समाधान

न्हावीमध्ये नागरिकांची कोरोना विषाणूंचा तपासणी सुरू ग्रामस्थांमध्ये समाधान

प्रतिनिधी सलीम पिंजारी

फैजपुर प्रतिनिधी :- तालुका यावल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा अंतर्गत व न्हावी आरोग्य केंद्रातर्फे न्हावी गावातील नागरिकांची कोरोना विषाणू संदर्भात तपासणी करण्यात आली.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनातर्फे घरोघरी आशा वर्कर महिलांना माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात आली.तसेच थर्मल पॉवर मशीननेेे नागरिकांची तपासणी करू जनजागृती करण्यात आली. ही मोहीम न्हावी गावात सकाळी 09:00 वाजेला सुरू करण्यात आली.यावेळी आशा वर्कर मंगला रामा कोळी, तसेच आरोग्य सेविका व मदतनीस सिंधुबाई किशोर चौधरी, पुष्पा प्रकाश लोंढे,जयश्री लोमेश चौधरी, शकुंतला सुरेश लोंढे या महिला उपस्थित होत्या. सध्या जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढतच असून त्यामुळे खबरदारी म्हणून दहावीच्या आरोग्य केंद्रामार्फत सध्या ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरू असून आरोग्य विभागातर्फे जनजागृती सह ग्रामस्थांशी तपासणी केली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button