मावळचे आमदार सुनिल शेळके यांना आदिवासी भागातील प्रश्नाबाबत बिरसा क्रांती दलाचे निवेदन देऊन चर्चा
पुणे प्रतिनीधी – दिलीप आंबवणे
मावळ तालुक्यातील अंदर मावळ या आदिवासी भागातील अडचणी बाबत आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांना बिरसा क्रांती दल मावळ वतीने निवेदन देण्यात आले.
आदिवासी भागातील अंदर मावळात आरोग्य सेवा केंद्र सुरळीत चालू करवीत, वनविभागाची जागा प्रशासकीय कामासाठी आदिवासी गावांना मिळावी. स्म्शानभूमीसाठी, शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय अशा सार्वजनिक कामासाठी मिळावी, Kovid -19 यांच्या प्रादुर्भाव मुळे लोक बेरोजगार आहेत त्याना वीज बिल माफ व्हावे, सावळे व कळकराई येथील वीज कनेक्शन सुरळीत चालू करणे बाबत अशा अनेक समस्यावर चर्चा करून निवेदने देण्यात आले.
यावेळी बिरसा क्रांती दल मावळ तालुका अध्यक्ष अंकुशभाऊ चिमटे, उपाध्यक्ष लहू दगडे, उपाधयक्ष कांताराम असवले, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मारूती खामकर सर, पुणे जिल्हा संघटक विक्रम हेमाडे, महासचिव उमाकांत मदगे, प्रसिद्धीप्रमुख मधुकर कोकाटे, अशोक सुपे, बाळू पावशे, अण्णा कोकाटे, लक्ष्मण कावळे, जेष्ठ नेते शंकरराव सुपे, बजरंग लोहकरे, दशरथ आढारी, सुरेश कशाळे, सदुबुवा निसाळ आदी उपस्तित होते.






