लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनाच्या ठिकाणी गाडगेबाबांची जयंती साजरी
संदीप धाप
अमळनेर येथिल लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनाच्या २४ व्या दिवसलाही आंदोलन अखंडित सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी गाडगेबाबांची जयंती साजरी केली तर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे जळगांव जिल्हाध्यक्ष डॉ शाकीर शेख यांची सभा ही संपन्न झाली.

‘एन आर सी च्या माध्यमातून देशाची धर्म आधारीत फाळणी करण्याचे षडयंत्र राबविले जात आहे.असा घणाघात डॉ.शाकिर शेख यांनी यावेळी केला.’राष्ट्रीय किसान मोर्चा चे राज्याध्यक्ष प्रा शिवाजीराव पाटिल,गावरान जागल्या सेनेचे विश्वास पाटील आदिंसह मान्यवर उपस्थित होते.प्रस्तावित प्रा.जितेंद्र संदानशिव यांनी तर सूत्रसंचालन रियाज मौलाना यांनी केले. १ फेब्रुवारी पासून बेमुदत साखळी आंदोलन एन आर सी,सी ए ए,एन पी आर रद्द करा या मागणीसाठी सुरू आहे. सदर आंदोलन स्थळी विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंती,स्मृतिदिन प्रबोधन पर कार्यक्रमाच्या आयोजनातुन साजरे करण्यात येत आहेत.

गाडगे महाराज जयंती साजरी
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस प्रा लिलाधर पाटिल, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,रियजुद्दीन मौलाना,ऍड शकील काझी,प्रा.जितेंद्र संदानशिव यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. याप्रसंगी प्रा.लिलाधर पाटिल, रणजित शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शन नात सांगितले की,”गाडगे बाबांनी विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण करणारे कृतीयुक्त दाखले देत प्रवचनातून समाज जागृती केली.”
मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मृतिदिन
नुकतेच मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या स्मृति दिवसाला प्रा.अशोक पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले,यावेळी हमीद गुरुजी,सत्तार मास्टर, ऍड रज्जाक शेख,अर्षद अली नुरुद्दीन शेख,इकबाल शेख,अहेमद पठाण,मुशातक अली,अहेझ शेख,शाहरुख सिंगर,सफदर दादा,रशीद खाटीक,अखलाख भाई,रुखोनुद्दीन अहेलेकार,गयास अहेलेकार,राजू शेख अल्लाउद्दीन, हाजी मुजफ्फर शेख,अय्यूब पठाण,हाजी के बी शेख ,शराफत मिस्तरी, सलिम कुरेशी,रुक्नोद्दीन अहेलेकार,शेर खा पठाण, रईस भाई,खालीक अहेलेकार, निसार शेख,मुशरत अली,अब्दुल रहेमान मिस्तरी ,बशीर बांगी,जाकिर मिस्तरी, जाफर बुध्या मिस्तरी, महंमद अली,नुरुद्दीन शेख ,हाजी निजाम,अस्लम बागवान आदिंसह मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते.






