Amalner

?️अमळनेर कट्टा…कोरोनाचा.. पुनश्च हरि ओम… प्रादुर्भावामुळे व्यावसायिक छायाचित्रकार अडचणीत

?️अमळनेर कट्टा…कोरोनाचा.. पुनश्च हरि ओम… प्रादुर्भावामुळे व्यावसायिक छायाचित्रकार अडचणीत

कोरोनाने राज्यात पुन्हा कहर सुरू केल्याने सर्वत्र कडक निबंध लागू करण्यात आले आहेत . कोरोना वाढण्याच कारण पूर्ण पणे लग्नसमारंभ याच्यावर ठेवण्यात आले आहे…तर घटकही तितकेच जबाबदार आहेत परंतु तरी सुद्धा लग्नसोहळा हाच प्रमुख समजून त्यावर बंदी व निर्बन्ध घातले जात आहेत. मान्य आहे की परिस्थिती खुप वाढत आहे
त्याचा परिणाम लग्नसोहळ्यांवर होत आहे . मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांना सध्या बंदी घातल्याने कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडत असल्याने छायाचित्रकार व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत . जिल्ह्यात साडेपाच ते सहा हजार व्यावसायिक छायाचित्रकार आहेत . त्यांचा जीवन चरितार्थ लग्नसराईवरच अवलंबून असतो . त्यामुळे कोरोना विषाणूमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे . राज्यात वाढती कोरोना बाधितांची संख्या निश्चितच मोठी आहे. छायाचित्रकारांच्या नुकसानला कारणीभूत ठरत आहे . गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येने छायाचित्रकारांच्या आशेवर विरजण पडले आहे . लॉक | डाऊनमुळे लग्नसोहळे अवघ्या ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडत असल्याने थोड्या संख्येत फोटो काढता येतात . परिणामी कमी उत्पन्न मिळत आहे . त्यामुळे घर खर्च , वीज बिल , स्टुडिओचे भाडे , बँकेचे हप्ते देखील थकणार आहेत . आधीच मोबाइलमुळे फोटोग्राफी व्यवसाय धोक्यात आला असून त्यात कोरोनाची भर पडली आहे . व्यवसायासाठी लाखो रुपयाचे कॅमेरे छायाचित्रकारांनी घेतले आहेत . त्या कर्जाचा भार असताना कोरोनामुळे आर्थिक नुकसान होत आहे . एका लग्न समारंभावर छायाचित्रकारासह अनेक लहान – मोठे घटक अवंलबून असतात . मागील वर्षीही कोरोनाचा छायाचित्रकारांना आर्थिक फटका बसला होता . यंदाही लग्न तारखा मोठ्या प्रमाणात निश्चित झाल्या असताना आता त्या रद्द होत असल्याने छायाचित्रकार संकटात सापडले आहेत . एप्रिल आणि मे महिन्यातच मोठ्या संख्येने लग्नसोहळे होतात . शासनाने आर्थिक मदत करावी , अशी मागणी छायाचित्रकारांकडून होत आहे .

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने मागील वर्षी झालेल्या नुकसानभरपाई तुन सावरत नाही तोवर परत हे सावट उभे आहे..आता जर असे सुरू राहिले तर उपासमारीची वेळ येईल. दिवाळीनंतर लग्न समारंभ धुमधडाक्यात पार पडले . त्यामुळे पुढील सिझन चांगला होईल , अशी आशा निर्माण झाली . त्यामुळे काही फोटोग्राफर बांधवांनी नवीन कॅमरा,तर काहींनी व्यवसासाठी लागणारे साहित्य इकडून तिकडून पैसे जमा करून केले व आता परत तीच परिस्थिती दिसत असल्याने फोटोग्राफर व इतर लोक आता पूर्णपणे खचत चालले आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे लग्न तारखा रद होत असून नुकसान वाढेल . कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला तर उपासमारीची वेळ येईल . छयाचित्रकार – महेंद्र पाटील,अमळनेर

कोरोनाचा बचाव साठी सरकारने कोरोनाची लस देणे सुरु केले आहे. फोटोग्राफर हा नेहमी गर्दीचा स्थळी काम करीत असतो त्यामुळे लसीकरणा मध्ये फोटोग्राफरना पण लवकरात लवकर समाविष्ट करणे हि विनंती – छयाचित्रकार -मनोज चित्ते , अमळनेर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button