Pandharpur

भाजपच्यामहाराष्ट्र बचाओ आंदोलनावर राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे यांची जोरदार हल्लाबोल

भाजपच्यामहाराष्ट्र बचाओ आंदोलनावर राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे यांची जोरदार हल्लाबोल

प्रतिनिधी रफिक आतार

महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, ही भूमी संतांची, क्रांतिकारकांची, शूरवीरांची, थोर महापुरुषांची, याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे शपथ घेतली, आणि या महाराष्ट्राच्या विरोधात आलेल्या औरंगजेब, दिलेरखान ,अफजलखान, यांच्या कबरी ही याच महाराष्ट्रात बांधल्या हा इतिहास आजही याच महाराष्ट्रात अभिमानाने वाचला जातो.आणि सांगितला ही जातो.भारत देशात आणि राज्यात स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर ही अनेक आंदोलने, अनेक मोर्चे, अनेक सत्याग्रह, झाली यासाठी अनेकांनी बलिदान दिले. महाराष्ट्र निर्मिती वेळीही अनेक जण या महाराष्ट्राच्या भूमीसाठी शहीद झाले, या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण,स्व. वसंतदादा पाटील, स्वर्गीय सुधाकरराव नाईक.स्व विलासराव देशमुख आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब पासून ते आताचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अनेक नेत्यांचे आपल्या आपल्या कल्पनेने हा महाराष्ट्र उभा केला.आताची परिस्थिती बघितली तरी ह्या महाराष्ट्रातून अनेक नागरिकांचे लोंढेच्या लोंढे आपल्या आपल्या गावी जात आहे,पण एक ही लोंढा महाराष्ट्र येताना दिसत नाही हे आख्या महाराष्ट्रने पाहिले आहे.म्हणजेच या महाराष्ट्राने महाराष्ट्रातील माती तयार झालेल्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करत असतानाच आजूबाजूचा राज्यातील लोकांना सुद्धा रोजगार या महाराष्ट्राने दिला हे आज अभिमानाने सांगावे लागेल पण याच महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सारखा सुसंस्कृत पक्ष महाराष्ट्र बचाव असे आंदोलन करत आहे. ही खरी शोकांतिका आहे. कारण कोरोनाचे संकट राज्यावर असताना. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणाने पूर्ण ताकदीनिशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे ,गृहमंत्री अनिलभाई देशमुख,जलसंपदा मंत्री मा श्री जयंत पाटील साहेब, महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात, श्री अशोकरावजी चव्हाण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,उच्च शिक्षण मंत्री उदयजी सामंत ,कृषिमंत्री दादा भुसे ,ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब,असे अनेक नेते आपापल्या परीने या महाराष्ट्रातील जनतेला आधार देऊन महाराष्ट्राला सावरण्याचा प्रयत्न करीत असताना. मात्र भारतीय जनता पार्टी हा विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना सत्तेत असलेल्या पक्षाची चुकीची ध्येय धोरणे जनते समोर मांडून यां सरकार ने अश्या काळात कसे राज्य चालविले पाहिजे हे दाखवून द्यायचे सोडून.
हे फक्त या काळात राज्यपाल यांना एक दिवस आड भेट घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे मुख्यमंत्रिपद कसे धोक्यात येईल हेच घाणेरडे राजकारण भारतीय जनता पार्टी करत असताना या संबंध महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे ही जनता यांनी केलेले राजकारण कधीही विसरणार नाही.उलट अशा काळात 101 500 आमदारांची मजबूत संख्या आपल्याजवळ असताना केंद्रातील आपलेच भाजपाचे सरकार असताना आपण मोदी साहेबांना सांगून या महाराष्ट्रातील आलेल्या अडचणीत जास्तीत जास्त मदत मिळवून देऊन याचे श्रेय फडणीस साहेब आणि चंद्रकांत दादा आपण घेऊ शकला असता अशा काळात आपण केलेली मदत पाहून त्या महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा आपल्याला डोक्यावर घेतले असते व आमच्यासारख्या टीका करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या बाबतीत अभिनंदनाचे लेख लिहावे लागले असते ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मधून आपण पाच वर्ष या राज्याचे नेतृत्व केले. याच काळात आपण महाराष्ट्राला मदत न करता महाराष्ट्रातील जनतेने उद्योगपतींनी पंतप्रधान साहाय्यता निधी साठी मदत करा. म्हणून आपण व आपले सर्व नेते व्हिडिओ माध्यमातून जाहीर पणे बोलत होतात याचे व्हिडीओ आजही सोशल मीडियावर दिसत आहेत. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र सरकारला मदत करू नका म्हणून सांगणारे आपण आज महाराष्ट्र बचाव हे नौटंकी आंदोलन करण्याचा तरी आपल्याला नैतिक अधिकार तरी आहे का ? हे तपासून पहा
कोरोनाचे संकटात महाराष्ट्र असताना. आपल्या भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रातील जनतेला कोणत्या, कोणत्या प्रकारे मदत केली. हे तरी आपण महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. उलट आपण अशा काळात पंढरपूरच्या आषाढी वारी साठी वारकऱ्यांना फूस लावून त्यातही वारकऱ्यांना सरकारच्या विरोधात उभे करण्याचे काम करीत आहात. फडणवीस साहेब हे आपल्या रक्ताला न शोभणारे काम आहे. आणि आपल्याला वारीत यायचे होते.तर गेल्या वेळेस यायचे ना ?मराठा बांधवांनी आपल्या पूजेला विरोध करण्यासाठी वारीत साप सोडु म्हणून अफवा काय पसरली तर आपली पाचावर धारण बसली होती.अन वारकऱ्यांच्या जीविताला धोका होऊ नये असे कारण देऊन. त्यावेळी आपण पंढरपूर येणे टाळून आपल्या घरीच विठ्ठलाची पूजा करून समाधान मानले म्हणजे तो विठ्ठल ही जाणवत असेल आपल्या मनात किती कपट आहे हे पाहून तरी त्या विठ्ठलाने त्यामुळेच आपली पुजा नाकारले असेल हे आज मितीला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात येत आहे
मुळात हे महाराष्ट्र बचाव आंदोलन नसून हे केंद्र सरकारचे अपयश लपवा आंदोलन आहे ,कारण खा राहुलजी गांधी यांनी 12/02/20 रोजी आपल्या ट्विटर अकाउंट वरून या कोरोना व्हायरस ची माहिती देऊन सुद्धा मोदी साहेबांनी त्याकडे दुर्लक्ष करून ,अमेरिका चे राष्ट्राध्यक्ष यांच्या स्वागतात अन मेजवानी देण्यात व्यस्त राहिले,आणि हेच अपयश आपल्याला स्वस्थ बसू देईना झाले,म्हणून महाराष्ट्राच्या जनतेल मदत करायची सोडून महाराष्ट्र बचाव हे नौटंकी आंदोलन करत आहात हे
फडणवीस साहेब हे आपल्या सुसंस्कृत पक्षाला शोभणारे नाही. राजकारण काहीही घडेल पण हा महाराष्ट्र आपण केलेले घाणेरडे राजकारण कदापी विसरणार नाही हे ही लक्षात असू द्या,,,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button