Parola

पारोळा तालुक्यातील मौजे -टोळी येथील दलित चर्मकार मुलीवर सामुहिक बलात्कार करून मारल्या प्रकरणी चर्मकार महासंघ तर्फे चोपडा येथे विविध ठिकाणी निवेदन देण्यात आले

पारोळा तालुक्यातील मौजे -टोळी येथील दलित चर्मकार मुलीवर सामुहिक बलात्कार करून मारल्या प्रकरणी चर्मकार महासंघ तर्फे चोपडा येथे विविध ठिकाणी निवेदन देण्यात आले

प्रतिनिधी : हेमकांत गायकवाड जळगांव

जळगांव : जळगाव जिल्हातील पारोळा ता‌लुक्यातील मौजे-टोळी येथील चर्मकार समाजाच्या अनुसूचीत जातीच्या २० वर्षीय तरुणीच अपहरण करून सामुहिक बलात्कार करून विष पाजून तिला ठार मारल्या प्रकरणी आज राष्ट्रीय चर्मकार महासंघ चोपडा तालुका तर्फे तालुका शहर पोलीस स्टेशन मा. पोलिस निरीक्षक अधिकारी साहेब व मा. तहसीलदार साहेब चोपडा यांना निवेदन देण्यात आले. तसेच त्या नराधमांची केस फास्ट ट्रॅक कोर्टात करून त्यांना फाशी ची शिक्षा देण्यात यावी. व पीडित परिवाराचे स्थलांतर करून दुसऱ्या जागेवरती पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व माजी समाज कल्याण मंत्री चर्मकार ह्रदयसम्राट मा. श्री. बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली करीत आहोत.तसेच आमचे म्हणणे, मा. पंतप्रधान, मा. महामहिम राष्ट्रपती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, व तत्सम अधिकारी यांच्यापर्यंत पोहचावी ही नम्र विनंती.निवेदन देतांना उपस्थित जिल्हा युवा अध्यक्ष विनोदभाऊ खजुरे, जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे, तालुका अध्यक्ष संतोष विसावे, तालुका संघटक जितेंद्र विसावे, शहर युवा अध्यक्ष निलेश वाघ, तालुका अध्यक्ष कर्मचारी अधिकारी परेश चित्ते (सर), तालुका सचिव रवींद्र मोरे, उत्तम चव्हाण सर, जिल्हा उपाध्यक्ष कर्मचारी अधिकारी ईश्वर सौंदारकर सर, सिताराम वाघ सर, माजी सभापती पं. स. गोपाळराव सोनवणे, सचिन बाविस्कर, मयूर विसावे, रुपेशकुमार अहिरे, दिनकरराव शिरसाठ, रुपेश मोतीराळे, बन्सी पवार, मंगल चव्हाण, शंकर साळुंखे, मनोज विसावे, दगडू अहिरे, अरुण मोरे, लोटन मोरे, महेंद्र शिरसाठ, राजेंद्र खजुरे, राकेश वाघ, अर्जुन चव्हाण, मनोज वाघ, ऋषिकेश वाल्हे, राहुल पवार, ज्ञानेश्वर काविरे, राहुल काविरे, गोविंद खजुरे, राजेश काविरे, मोहन साळुंखे, सागर काविरे, रोहित सूर्यवंशी या प्रसंगी ई. उपस्थित होते. सदर माहिती पदाधिकारी यांच्या कडुन मिळाली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button