निळे प्रतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे ६ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण सोहळा
औरंगाबाद प्रतिनिधी राहुल खरात- ’निळे प्रतिक’ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाNया़, समाजातील मान्यवरांना ६ ऑक्टोबर रोजी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. या प्रसंगी निळे प्रतिक या वृत्तपत्राचा दहावा वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
मौलाना आझाद संशोधन केंद्र टी.व्ही.सेंटर येथे ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे हे भूषविणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन दुबईचे उद्योजक श्री.बी.डी.गवई यांचे हस्ते होईल. ’दिव्य मराठी’ चे संपादक संजय आवटे, विद्रोही साहित्यिक जिजाताई राठोड, विद्रोही कवचित्री प्रा.डॉ.प्रतिभा अहिरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील. प्रमुख पाहूणे म्हणून अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले, सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.भगत, एम.एस.ई.बी.चे कार्यकारी अभियंता एकनाथ वाघ, जिल्हा माहिती अधिकारी मुवुंâद चिलवंत, प्राचार्य सुनिल वाकेकर, सामाजिक कार्यकर्ते अंबादासराव रगडे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सर्व निमंत्रितांनी व पुरस्कारपात्र मान्यवरांनी, चाहत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रतनकुमार साळवे, यांनी तसेच एडीटर अॅण्ड प्रेस रिपोर्टर्स असोसिएशन औरंगाबाद व संकेत सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेकडून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







