Amalner

बहुजन क्रांती मोर्चा आयोजित कश्मिर ते कन्याकुमारी राष्ट्रव्यापी ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा दि.७ सप्टेंबर रोजी अमळनेर येथे होणार दाखल

बहुजन क्रांती मोर्चा आयोजित कश्मिर ते कन्याकुमारी ‘राष्ट्रव्यापी ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा’ दि.७ सप्टेंबर रोजी अमळनेर येथे होणार  दाखल

बहुजन क्रांती मोर्चा आयोजित कश्मिर ते कन्याकुमारी राष्ट्रव्यापी ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा दि.७ सप्टेंबर रोजी अमळनेर येथे होणार दाखल

अमळनेर बहुजन क्रांती मोर्चा आयोजित कश्मिर ते कन्याकुमारी ‘राष्ट्रव्यापी ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा’ दि.७ सप्टेंबर रोजी अमळनेर येथे दाखल होत असून छ. शिवजीमहाराज नाट्यगृह येथे   भव्यसभा आयोजित करण्यात आली आहे.
                देशभरात बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने काढण्यात आलेली सदर परिवर्तन यात्रा १८० दिवसांपासून १७ राज्यातील १८० लोकसभा क्षेत्रात  व्यापत आहे. महाराष्ट्रात १६ ऑगस्ट पासून सुरू झालेली ‘राष्ट्रव्यापी ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा’ दि .७ सप्टेंबर ला अमळनेर येथे सकाळी ११ वाजता दाखल होईल. यावेळी छ. शिवाजी महाराज नाट्यगृह येथे बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम हे प्रमुख वक्ते म्हणून इ व्ही एम भांडाफोड या विषयावर घणाघाती प्रबोधनपर मार्गदर्शन करतील.सभेचे उदघाटक म्हणून दंत व मुखरोग तज्ञ डॉ.प्रशांत देवरे  हे उपस्थित असतील. यावेळी प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अड.ललिता पाटील,जिल्हा बँक संचालक रा.काँग्रेस चे अनिल भाईदास पाटील,आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री साळुंखे,राष्ट्रीय किसान मोर्चा चे राज्य प्रभारी  प्रा.शिवाजीराव पाटील,
काँग्रेस तालुकाअध्यक्ष गोकुळ पाटील,शहराध्यक्ष मनोज पाटील, रा.काँ.तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटिक,आर.पी.आय तालुकाध्यक्ष श्यामभाऊ संदानशिव,तालुकाध्यक्ष यशवंत बैसाणे,भा री प अध्यक्ष दाजीबा गव्हाणे, सुन्नी दारुल कझा अध्यख फैय्याज पठाण,मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन अध्यक्ष रियाझ मौलाना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील, धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व.ता.पाटील, अध्यक्ष डी. डी. पाटील, नगरसेविका सविता संदानशिव.नगरसेवक सलिम शेख चिरागोद्दीन,नगरसेवक संजय पवार,बहुजन रयत परिषद चे अध्यक्ष संजय मरसाळे, मुस्लिम युथ सेवा चे उपाध्यक्ष गुलाम नबी पठाण,आदिंसह विविध पक्ष व पुरोगामी, बहुजन सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमळनेर बहुजन क्रांती मोर्चा  च्या वतीने करण्यात आलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button