Aurangabad

पदवी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 9 ऑक्टोबर पासून परीक्षांना प्रारंभ

पदवी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 9 ऑक्टोबर पासून परीक्षांना प्रारंभ

औरंगाबाद :- गणेश ढेंबरे

औरंगाबाद, दि.३ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ९ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १ ऑक्टोबर पासून सुरु होणार होत्या. तथापि कर्मचा-यांच्या राज्यव्यापी संपामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. या संदर्भात मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.तीन) महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस प्रकुलगुरु डॉ.प्रविण वत्तेâ, सर्व अधिष्ठाता, परीक्षा मंडळाचे सदस्य उपस्थत होते. या बैठकीत परीक्षेचे पेâर वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पदवी परीक्षा ९ ऑक्टोबर पासुन सुरु होणार असून २९ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहेत. यामध्ये बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश आहे. यावर्षी पहिल्यांदाच बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (एमसीक्यु) पध्दीतीने परीक्षा घेण्यात येईल.

ऑफलाईन तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षा होणार असून कोरोना साथीच्या पाश्र्वभुमीवर फिजिक्ल डिस्टन्सिंग ठेऊन परीक्षा घेण्यात येणार आहेत. याबाबत परीक्षा केंद्रांनी पुर्ण जबाबदारीने काळजी घ्यावी यासाठी नियमावली करण्यात येणार आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नियमावली बनविण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button