Amalner

?️ कोरोना  रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जळगाव जिल्ह्यात केंद्रीय पथकाची नेमणूक करावी-ऍड.ललिता पाटील.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जळगाव जिल्ह्यात केंद्रीय पथकाची नेमणूक करावी-ऍड.ललिता पाटील.

जळगाव

जिल्हयात जळगावसह अमळनेर,पाचोरा,भुसावळ,चोपडा या ठिकाणी कोरोणा पाॅझिटीव रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असुन त्यात अमळनेर शहरातील वाढती संख्या ही अतिशय गंभीर बाब बनली आहे.जिल्हा व तालुका प्रशासन आपल्या परीने प्रचंड मेहनत घेत असुनही ही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाला मदत व वाढीव उपाययोजना मिळण्यासाठी जळगाव जिल्ह्यात केंद्रीय पथकाची नेमणूक करावी अशी मागणी जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा ऍड.ललिता पाटील यांनी केली आहे.

पंधरा दिवसापूर्वी ग्रीन झोनच्या उंबरठ्यावर असणार्या जळगाव जिल्ह्यात कोरोणा पाॅझिटीव रुग्णांची संख्या झपाट्याने वाढुन १७४ एवढी झाली असुन यामधे फक्त अमळनेर शहराची असणारी १०४ संख्या ही अतिशय चिंताजनक बाब आहे.जिल्हा व तालुका प्रशासनाने वेळोवेळी खबरदारी घेत उपाययोजना करुनही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढणारी संख्या हि भयावह बाब आहे.त्यात प्रामुख्याने पाॅझिटीव रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांना क्वारंटाईन करुन,त्यांची राहण्याची,भोजनाची व्यवस्था तसेच चाचणी संदर्भात उपाययोजना करताना व विशेषता नागरिकांना शिस्त लावताना पोलिस व प्रशासनाची दमछाक होत आहे. क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची चाचणी त्याच दिवशी वेळेवर होत नसल्याने व रिपोर्ट उशिरा आल्याने त्या पाच ते सात दिवसात रुग्णांची व त्यांच्या कुटुंबियांची हेळसांड होऊन ते माणसिक दृष्टीने खचून कोरोणा विषयी भिती सामान्य जनतेत निर्माण झालेली आहे.महसूल मिळविण्यासाठी उघडण्यात आलेल्या दारुच्या दुकानांमुळे हजारो लोक दारुच्या दुकानावर रांगा लावत सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडवून संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.तसेच क्वारंटाईन सेंटर व प्रतिबंधक क्षेत्रात निर्जतुकीकरणं वेळोवेळी होत नसल्याने संक्रमणाचा धोका वाढत आहे

आरोग्य खाते,पोलिस खाते,नगरपालिका कर्मचारी,महसूल खाते आपले काम प्रामाणिकपणे पार पाडून देखील रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यात केंद्रीय पथकाची नियुक्ती करुन उपाययोजना करण्यासाठी वाढीव निधीचे पॅकेज जाहीर करावे व लोकांना शिस्त लावण्यासाठी व पोलिसांना मदत म्हणुन सैन्य दलाची नियुक्ती करावी अशी मागणी जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,आरोग्य मंत्री राजेश टोपे,जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे ईमेलद्वारे पत्र पाठवून केली आहे.

तसेच मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,मा.ना.राजेश टोपे, मा.ना.देवेंद्र फडणवीस साहेब, मा.जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे साहेब यांच्याशी भ्रमण ध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button