Pune

पुणे दौंड तालुक्यातून आदिवासी कुंटूबाची सुटका – बिरसा क्रांती दल ( BKD ) औंरगाबाद जिल्हाध्यक्ष केशव पवार यांनी केला संघर्ष

पुणे दौंड तालुक्यातून आदिवासी कुंटूबाची सुटका – बिरसा क्रांती दल ( BKD ) औंरगाबाद जिल्हाध्यक्ष केशव पवार यांनी केला संघर्ष

दिलीप आंबवणे पुणे

पुणे : बिरसा क्रांती दलाचे औंरगाबाद जिल्हाध्यक्ष केशव पवार यांनी पुणे जिल्हातील दौंड तालुक्यातील केडगाव येथील शेतकरी सचिन लडकत यांच्या जाचातून आदिवासी जोडप्याची सुटका केली.
यवत पोलीस ठाण्याचे पी.आय. साहेब यांनी अनमोल सहकार्य केले.
आदिवासी समाजाचे नेते तसेच बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष विजय आढारी साहेब, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, आदिवासी सेवा संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश मुंढे यांच्या विशेष सहकार्यामुळे आज दिंनाक 7/2/2021 रोजी सकाळी 9 वाजेपासून रात्री 10:30 पर्यत केलेल्या संघर्षाला यश आले.
तसेच बिरसा क्रांती दलाचे महासचिव अँड.प्रमोद घोडाम सर यांचे आदेश आल्याने बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख सुशिल पावरा हे संपर्कात राहून घडामोडीवर लक्ष ठेवून होते.
गोडी गुलाबीनी दुपारी 1 ते 5 पर्यत मिटींग करून लडकत मालक ऐकत नव्हता पण शेवटी यवत पोलीसांनी सचिन लडकत या व्यक्तीला घरातून रात्री 8 वाजता उचलून आणले.
व पोलीस ठाणे यवत या मध्ये बैठकीला बिरसा क्रांती दलाचे औंरगाबाद वरून आलेले जिल्हाध्यक्ष केशव पवार व उपाध्यक्ष भगवान गोलवाड, सदस्य सचिन त्रिभुवन लक्ष्मण पवार यांनी रात्री 10 वाजेपर्यत चर्चा करुन फैसला घेतला.
अखेर सचिन लडकत ची पोलीसानी बोलती बंद करून रात्री 10:30 वाजता आदिवासी जोडपेची सुटका करून दिली.
पोलीसाचे सहकार्य लाभल्यामुळे मनापासून बिरसा क्रांती दलाने आभार मानले असे केशव पवार यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button