?️अमळनेर कट्टा…शेतकी संघात चोरी..!एकूण 60 हजाराचा ऐवज लंपास..
अमळनेर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी चक्क शेतकी संघातच चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. धुळे रोडवरील आर. के. नगर समोरील शेतकी संघ गोदमाचा दरवाजा तोडून अग्निशामक सिलिंडर ,मोटारी व इतर असे एकूण ६०
हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत सविस्तर माहिती अशी की शेतकी संघाच्या गोदामात इलेक्टरीक साहित्य व मोटारी ठेवले होते. शेतकी संघामार्फत रेशन दुकान चालवणारे अरुण भगवान पाटील यांनी फोन करून शेतकी संघाच्या व्यवस्थापकांना कळवले की गोदामच्या लाकडी दरवाजे तोडलेले दिसत आहेत. व्यवस्थापक
संजय पाटील व कर्मचारी सुभाष पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना आतील बरेच साहित्य जागेवर आढळून आले नाही. यात ५ अश्वशक्तीच्या २२ मोटारी ,३ अश्वशक्तीची एक मोटार , २० पुली , काटा प्लेट , १८ जीन रोल , १६ जाळ्या ,सुऱ्या, गियर, ८ बादल्या , ३ अग्निशामक सिलिंडर , बेअरिंग , तीन मशीन , पाण्याच्या टाक्या , बॅटरी , पाईप असे सुमारे ६० हजार रूपये किमतीचे जुने साहित्य चोरून नेले आहे. संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक सुनील हटकर करीत आहेत.






