Aurangabad

बालकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रुग्णालयांनी सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

बालकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रुग्णालयांनी सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांची, बालकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायांसह सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, बालरोगतज्ञ आणि आरोग्ययंत्रणांनी उपचार सुविधांसह सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बालकोविड संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत बालरोग तज्ञांसमवेतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना निर्देशित केले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हयात संभाव्य तिसऱ्या लाटेतील संसर्गात 0 ते 18 वर्षाखालील वयोगटातील सर्व बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवत हा संसर्ग पूर्णत: रोखण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालय, सर्व बालरोगतज्ञ, वैद्यकीय तज्ञ आणि आरोग्य यंत्रणा यांनी सर्तक रहावे असे ही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button