Chalisgaon

अभोणे तांडा येथील श्री राहुल राठोड यांचा जलयोध्दा म्हणून सन्मान..

अभोणे तांडा येथील श्री राहुल राठोड यांचा जलयोध्दा म्हणून सन्मान


प्रतिनिधी : चाळीसगाव


चाळीसगाव : तालुक्यातील अभोणे तांडा पाणी फाऊंडेशन सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धेत तालुक्यातून प्रथम आलेल्या गावातील एक ध्येयवेडा तरुण श्री राहूल राठोड आपले गाव पाणीदार झाले म्हणून न थांबता तालुका ही पाणीदार करण्याचा ध्यास घेऊन मागील वर्षी चाळीसगाव तालुक्यात सुरु झालेल्या
शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानात सहभागी होऊन आपला अनुभव सत्मार्गी लागावा यासाठी प्रशिक्षण टिम तालुका समन्वयक म्हणून जबाबदारी स्विकारली व तालुक्यातील गावागावात जाऊन जलसाक्षर लोकांची एक फळी तयार करण्यास सुरुवात केली त्यामुळे या उपक्रमात सहभागी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामे उभी राहीली.
शिवनेरी फाऊंडेशन भूजल अभियान सहज जलबोध अभियान अंतर्गत पहीले खानदेशस्तरीय जल संमेलन नुकतेच चाळीसगाव येथे संपन्न झाले. याप्रसंगी तालुका समन्वयक म्हणून चांगली कामगिरी केल्याबद्दल श्री राहूल राठोड यांचा चाळीसगावचे लाडके आमदार श्री मंगेशदादा चव्हाण, सहज जलबोधकार श्री उपेंद्र दादा धोंडे, भूजल अभियानाचे संगणक अभियंता श्री गुणवंत सोनवणे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.श्री. बि. एन. पाटील, कृषी उपसंचालक श्री अनिल भोकरे, प्रांत अधिकारी श्री.लक्ष्मीकांत साताळकर,तहसीलदार श्री.अमोल मोरे,बि डि ओ श्री.नंदकुमार वाळेकर,जल तज्ञ सौ.अनुपमा पाटील, श्री.दिवाकर धोटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button