Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेरात १०५ फुटावरील तिरंगा पुन्हा एकदा फडकण्याच्या प्रतीक्षेत माजी आमदार साहेबराव पाटील यांची संकल्पना

?️ अमळनेर कट्टा… अमळनेरात १०५ फुटावरील तिरंगा पुन्हा एकदा फडकण्याच्या प्रतीक्षेत माजी आमदार साहेबराव पाटील यांची संकल्पना

अमळनेर : भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचे प्रतिक आहे.अमळनेर नगरपरिषदेने माजी आमदार कृषिभुषण साहेबराव पाटील यांच्या संकल्पनेतून धुळे अमळनेर चोपडा राज्यमार्ग १५ वरील सुशोभीकरण व विद्युतीकरण झालेल्या कारंजा चौकात १०५ फुट उंचीचा राष्ट्रध्वजस्तंभ उभारण्यात आला असून त्यावर २०×३० फूट आकारमानाचा आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यात येणार आहे.
राष्ट्रध्वज बनविण्याची व फडकवण्याची काही विशिष्ट अशी नियमावली आहे.झेंडा ९९ फुट उंचीवर असेल तर झेंड्याला रोज सायंकाळी खाली उतरवावे लागते,पण शंभर फुटाच्या वर असेल तर झेंडा कायमस्वरूपी फडकता असतो,झेंड्याला सायंकाळी खाली उतरविण्याची गरज नसते.झेंडा कायम प्रकाशझोतात ठेवावा लागतो त्यासाठी जनरेटरची सोय करण्यात आली आहे.भारतीय राष्ट्रध्वज संहिता २००६ अनव्ये कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आली आहे.
खरतरं महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनी समारंभपूर्वक उभारणी केलेल्या राष्ट्रध्वजाचा अनावरण सोहळा आयोजित करण्याचा आदेश होता.तथापि महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना बधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी व सदर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लागू आहेत.त्यामुळे गत वर्षाप्रमाणेच राज्यात महाराष्ट्र दिन समारंभ साधेपणाने फक्त जिल्हा मुख्यालयातच ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.त्यामुळे नगरपरिषदेतर्फे कारंजा चौकातील उभारणी करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा अनावरण सोहळा स्थगित करण्यात येत आहे असे लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील,उपनगराध्यक्ष,सर्व सभापती,सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांनी कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button