Maharashtra

रेड स्वस्तिक सोसायटी नागपुर द्वारा शैक्षणिक मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ….. पारधी समाजातील गुणवंतांचा सत्कार

रेड स्वस्तिक सोसायटी नागपुर द्वारा शैक्षणिक मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ….. 
पारधी समाजातील गुणवंतांचा सत्कार

रेड स्वस्तिक सोसायटी नागपुर द्वारा शैक्षणिक मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ..... पारधी समाजातील गुणवंतांचा सत्कार

नागपुर :प्रतिनिधी अनिल पवार
शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ .रेड स्वस्तिक सोसायटी तर्फे १८ऑगस्टला बनियन सभागृहात चिटणीस हॉल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .नागपुर जिल्हयातील पारधी समाजातील पदवीधर , पदव्यूत्तर विद्यार्थ्यांमधील  प्राजक्ता मंगल भोसले .हिने विदेशात जाऊन शिक्षण घेणारी एकमेक  पारधी समाजातील विद्यार्थीनी आहेत .प्राजक्ता मंगल भोसले हिने विदेशातुन (मास्टर इन ऑटोमोटिव डिजाइन इंग्लंड , व स्कूओला पॉलिटेक्निक डिजाइन इटली , इंजिनिअरिंग  नागपुर,)तर इत्यादी शिक्षण घेणारी एकमेक विद्यार्थीनीचा सत्कार आज नागपुर येथे रेड स्वस्तिक सोसायटी तर्फे स्म्रुतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला .यावेळी शिवानी सेनापती राजपूत हिने वर्ग दहावीमध्ये (प्रथम श्रेणी),  प्रतिक प्रभाकर भोसले वर्ग बारावी  मध्ये  प्रथम श्रेणी) या गुणवंतांचा सत्कार स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र व स्वामी विवेकानंद यांचे छायाचित्र देऊन  करण्यात आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रेड स्वस्तिक सोसायटी संस्थेचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे  सेवानिवृत्त उप्पर पोलिस महासंचालक मा .टिकाराम. एस . भाल.होते.यावेळी बोलतांना विद्यार्थांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात .जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो . ग्रामिण क्षेत्रातील आदिवासी गोरगरिब विद्यार्थांनी दहावी , बारावीमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थांसाठी रेड स्वास्तिक सोसायटीने नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून दरवर्षी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती देणार असल्याचे मार्गदर्शन करतेवेळी सांगितले 
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून तानिया इंडस्ट्रिज चे ऑनर्स   महावीर प्रसाद मानसिंगा होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कृत  वसंता भगत , आयडीबीआय बँकेचे  डायरेक्टर अर्जुन गुगल ,रा .स.तू .म विद्यापीठचे  परीक्षा मूल्यमापनचे डायरेक्टर डॉ अनिल होरेखान होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थाचे कार्याध्यक्ष व यवतमाळ  राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक  सुरेंद्र मनपिया यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले .
संचालन यांनी केले .तर आभार संस्था सचिव जगन्नाथ गराट  यांनी मानले .या कार्यक्रमाला जिल्हयातील शेकडो गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक , कार्यकर्ते उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button