Amalner

अमळनेर येथे माळी समाजातील शेतकऱ्यांच्या सन्मान शेतकऱ्याने बांधावरच्या शेतकरी न बनता शेतातला शेतकरी बनावे ; सुदाम महाजन

अमळनेर येथे माळी समाजातील शेतकऱ्यांच्या सन्मान शेतकऱ्याने बांधावरच्या शेतकरी न बनता शेतातला शेतकरी बनावे ; सुदाम महाजन

अमळनेर : आज-काल शेतकरी शेतात न राबता आता फक्त बांधावरील शेतकरी झालेले आहेत कारण ते बांधावरच उभे राहून मजुराला ऑर्डर देतात त्यामुळे शेतीला खर्च जास्त होतो म्हणून शेतकऱ्यांनी बांधावरील शेतकरी न बनता शेतातील काम करणारा शेतकरी बनावे असे आव्हान दोंडाईचे अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी यावेळी केले. माळी समाजातील जळगाव,धुळे, नंदुरबार सह महाराष्ट्रातील शेतीमध्ये नवनवीन उपक्रम राबवून शेती उत्पन्नात अव्वल दर्जा प्राप्त करणारे तसेच आपल्या शेतात काबाडकष्ट करून जिद्द, कल्पकता व प्रयोगशीलता यांच्या बळावर आव्हानांवर मात करण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या माळी समाजातर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आज अमळनेर येथे झालेल्या क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयात सुदाम महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर अमळनेर तालुक्याचे माजी आमदार शिरीष चौधरी, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, जि प सदस्य नाना पोपट महाजन, प्रा एस ओ माळी सर प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी माळी समाजातील शेतकऱ्यांच्या शाल, श्रीफळ, व सन्मानपत्र देऊन सपत्नीक आदर्श शेतकरी म्हणून गौरवण्यात आले. त्यात अरविंद रामदास मगरे (तळोदा),अनिल पुडलिक मगरे (तळोदा),चंद्रकांत ताराचंद महाजन (शिरपूर) ,भगवान शामराव महाजन (अडावद),साखरलाल बाबुराव महाजन (अडावद), लक्ष्मण उत्तम महाजन (अडावद), सचिन हिंमत महाजन (अडावद), प्रवीण इंदा महाजन (लासुर), संजय एकनाथ महाजन (अमळनेर), गंगाराम पुना महाजन (पारोळा), सुधाकर रघुनाथ महाजन (पिंपळी),गंगाराम विठ्ठल महाजन (चोपडा), पी डी चौधरी (दहिगाव), नंदलाल माधवराव महाजन (धानोरा),पांडुरंग सैतान महाजन (विखरण),उत्तम इंदा महाजन (खर्ची),अधिकार नारायण महाजन (निपाणे), विक्रम चिंधा महाजन (दहिवद),गुलाबराव आनंदा महाजन (अंबापिंप्री), गंगाराम विठ्ठल महाजन (किनगाव), सुभाष भगवान लोखंडे (तामसवाडी)यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवर म्हणून लासुरचा लोकनियुक्त सरपंच जनाताई सुखदेव माळी, सरपंच अडावद भावना पंढरीनाथ महाजन, नगरसेविका चोपडा संध्या नरेश महाजन, खर्ची सरपंच आशा विठ्ठल महाजन, अमळनेर नगरसेविका रत्नमाला साकारलाल महाजन, पारोळा नगरसेवक बापू तुकाराम महाज नगरसेविका अलका धिरज महाजन, बाबळे सरपंच ज्ञानेश्वर आधार माळी, पिंपळी सरपंच प्रेमराज वामन चव्हाण, अमळनेर नगरसेवक देविदास भगवान महाजन, माजी उपनगराध्यक्ष अनिल गंगाराम महाजन, यासह जळगाव,धुळे,नंदुरबार येथून माळी समाज मंडळांचे अध्यक्ष व समाज बांधव -भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचेआयोजन माळी समाजाचे मुखपत्र माळी भूषण कडून करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती शांताराम चव्हाण (अमळनेर) व मनीषा लोखंडे (शिरपूर) यांनी केले तर प्रास्ताविक मनोहर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन जितेंद्र महाजन (लासुर) यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button