Amalner

प्रसन्न चौधरीचे शिष्यवृत्ती परिक्षेत सुयश …..

प्रसन्न चौधरीचे शिष्यवृत्ती परिक्षेत सुयश …..

Amalner : नांद्री येथील चि. प्रसन्नने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा २०२० मध्ये ग्रामीण सर्वसाधारण (RURAL GENERAL) या संवर्गातून अमळनेर तालुक्यात प्रथम व जळगाव जिल्ह्यात सातवा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
तसेच त्याने यापूर्वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेत सुद्धा नेत्रदिपक यश संपादन करून तो नवोदय विद्यालय प्रवेशास पात्र झाला आहे.
त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. त्याला ज्ञानदिप क्लासचे आदरणीय श्री. ज्ञानेश्वर साळुंखे सर, सेंट मेरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल मंगरूळ ता. अमळनेर च्या आदरणीय मा.प्राचार्या , शिक्षकवृंद व आई,वडिल व बहिण सिद्धि दिदी.यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
तो श्री. हिंमत ओंकार चौधरी ( पदविधर शिक्षक, खवशी ) व सौ. निलम हिंमत चौधरी (उपशिक्षिका, मंगरूळ ) यांचा मुलगा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button