Chimur

राष्ट्रीयकृत बँकांच्या अटीमुळे बेरोजगार अर्जदारांची डीडीसाठी धावपळ

राष्ट्रीयकृत बँकांच्या अटीमुळे बेरोजगार अर्जदारांची डीडीसाठी धावपळ

अर्जदारांना आर्थिक फटका

चिमूर प्रतिनिधी—ज्ञानेश्वर जुमनाके
शासनातर्फे नवनि वन पदभरती घेण्यात येत आहे मात्र पदभरतिसाठी लागणाऱ्या डिमांड ड्राफ्टसाठी राष्ट्रीयकृत बॅंकेकडून वेवेगवेगळ्या अटी लावल्या गेल्या असल्यामुळे ज्यांचे बँक खाते आहे त्या बँकमध्ये असेल त्यांचा डिमांड ड्राफ्ट मिळेल या अटीमुळे अर्जदारांना केवळ डीडीसाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. बँकेकडून अर्जदारांना इतरत्र नेट कॅफेमध्ये जाऊन डिमांड ड्राफ्ट काढण्याच्या सुचना दिल्या जात आहे.
त्यामुळे जादा पैसे मोजून डिमांड ड्राफ्ट काढावी लागत असल्याने आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रासही सोसावा लागत आहे.
सध्या सर्व जिल्हा परिषद येथे अनुसुचित जमातीच्या जात वैधता पात्र धारकाच्या पदभरती घेण्यात येत आहे. त्याकरिता अर्जदारास विशिष्ट पदाकरिता अर्ज भरतांना राष्ट्रीयकृत बॅंकेचा डिमांड ड्राफ्ट सादर आवश्यक आहे. अर्जदार बॅंकेमध्ये डीडीसाठी गेले असता बॅंकेकडून ज्यांचे बँक खाते आहे, अशानाच संबंधित बॅंकेकडून डिमांड ड्रॉफ्ट देण्याची अट घातली गेली आहे. त्यामुळे बाहेरगावावरून शिक्षण घेणाऱ्या अथवा स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील बॅकमधून डिमांड ड्राफट काढणे शक्य होत नाही आहे. त्यामुळे केवळ डीडीसाठी त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
चिमुर येथे सध्या SBI आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया सेवा देत असुन येथे स्वतःचे बँक खाते असुनही डिमांड ड्राफ्ट दिल्या जात नाही. बॅंक कर्मचाऱ्यांकडून डिमांड ड्राफ्ट देणे बंद असल्याचे सांगितल्या जात आहे. तसेच सदर बँक विद्यार्थ्यांना इतरत्र नेट कॅफेमध्ये जाऊन डिमांड ड्राफ्ट काढण्याबाबत सांगत असल्यामुळे अर्जदारांना जादा पैसे मोजून डिमांड ड्राफ्ट काढावे लागत आहे. यामुळे अर्जदारांना आर्थिक र्भूदंड बसत असून डीडीसाठी इतरत्र भटकावे लागत असल्याने मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button