Maharashtra

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ना. छगन भुजबळ यांनी केली विलीगिकरण कक्षाची पाहणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ना. छगन भुजबळ यांनी केली विलीगिकरण कक्षाची पाहणी

आपत्तीच्या काळात अधिकाऱ्यांनी एकमेकांना मदत करून कामे करावी- ना.छगन भुजबळ

नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम डुबडे

सर्व जनता अडचणीत असतांना त्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपत्तीच्या काळात संवेदनशीलपणे काम करण्याची गरज आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकून काम न करता अधिकाऱ्यांनी एकमेकांना मदत करून कामे करावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिले. येवला तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ना.छगन भुजबळ यांनी आज पुन्हा येवला येथे अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी येवला कार्यालय येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, येवल्याच्या प्रांताधिकारी ज्योती कावरे, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे,येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, येवल्याचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, अनिल भवारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button