Ratnagiri

शिक्षकांबद्धल शिवराळ भाषेत लेख लिहणार्या लोकपञ वृत्तपत्र संपादकावर गुन्हा दाखल करून अटक करा:बिरसा क्रांती दलाची निवेदनाद्वारे मागणी..

शिक्षकांबद्धल शिवराळ भाषेत लेख लिहणार्या लोकपञ वृत्तपत्र संपादकावर गुन्हा दाखल करून अटक करा:बिरसा क्रांती दलाची निवेदनाद्वारे मागणी..

रत्नागिरी : मास्तरड्यांनो जरा जास्त काम केलेत तर मराल काय? अशा शिर्षकाच्या लेखात शिवराळ भाषेत शिक्षकाचा अपमान करणार्या लोकपञ कार्यकारी संपादक श्री. रविंद्र तहकीक यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, अशी मागणी शिक्षक तथा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल सुशीलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख व पोलीस महासंचालक मुंबई यांच्या कडे दिनांक 09/11/2020 रोजीच्या एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दैनिक लोकपत्र नावाच्या वृत्तपत्राचा सहसंपादक रवींद्र तहकीक त्याचा संपर्क क्रमांक 78 88 03 04 72 असा असून या व्यक्तीने आपल्या संपादकीय अग्रलेखात 8 नोव्हेंबर 2000 रोजी जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा अग्रलेख लिहिला.वास्तविक पाहता अशा शिवराळ भाषेत दोषी व्यक्तीचाही आपण उल्लेख केला जात नाही .असे असताना निष्पाप निरपराध प्रामाणिक शिक्षक बांधवांवर अतिशय शिवराळ भाषेत गंभीर आरोप करून आपल्या वृत्तपत्राला प्रसिद्धी मिळवण्याचा त्याने केलेला प्रयत्न अतिशय निंदनीय आहे अश्या वृत्तपत्रांमुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा मनोविकृत अप्रशिक्षित आणि लेखन परंपरेची अजिबात जाणीव नसलेल्या व्यक्तीला व त्याला पाठिंबा देणाऱ्या त्याच्या संपादक व मालकाला कराल तेवढी शिक्षा थोडी आहे.यासाठी आम्हाला रवींद्र तहकिक व त्याचा संपादक वृत्तपत्राचा मालक यांच्यावर महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्या वतीने दहा लाख रुपये प्रत्येक शिक्षक याप्रमाणे आम्ही समस्त शिक्षक बांधव त्याच्या त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करू इच्छितो परंतु अशा प्रकारचा फौजदारी खटला पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दाखल झाला नाही अशा प्रकारच्या गुन्ह्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करून हा अपवादात्मक खटला दाखल करण्यासाठी हा विचित्रप्रसंग योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी राज्य सरकारनेच अशा मनोविकृत व्यक्तीविरुद्ध फौजदारी खटला दाखल करावा त्याच्या वृत्तपत्रावर बंदी आणावी आणि समाजातील तमाम महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांचे मानसिक शारीरिक बौद्धिक अशा सर्व प्रकारचे इस्वास त्यामुळे त्याच्यावर एकूण 70 लाख कोटी रुपये इतका अब्रूनुकसानीचा खटला दाखल करावा किंवा आम्हाला त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्यासाठी रितसर परवानगी मिळावी त्या साठी सर्वप्रथम आमची तक्रार प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद रजिस्टर मध्ये नोंदवून घ्यावी. यासाठी आपण आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आदेशित करावे ही आपणास नम्र विनंती करीत आहे. पुराव्यासाठी अशा मनोविकृत व्यक्तीने केलेल्या संपादकीय लेखकाचा साक्षांकित पुरावा सोबत जोडत आहे तरी अशा मनोविकृत व्यक्तीला तत्काळ अटक करावी.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button