Chalisgaon

महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळ्या घाला म्हणणा-या कन्नड संघटनेचा रयत सेनेकडुन निषेध – मुख्यमंत्र्यांना निवेदन

महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळ्या घाला म्हणणा-या कन्नड संघटनेचा रयत सेनेकडुन निषेध – मुख्यमंत्र्यांना निवेदन

मनोज भोसले

चाळीसगाव – गेल्या ६० वर्षांपासुन कर्नाटकात सिमा प्रश्नावरुन वाद सुरु आहे त्यात मराठी बांधवांवर अन्याय होत असुन न्याय मागणा-या महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळ्या घाला असे वादग्रस्त वक्तव्य कन्नड संघटनेकडुन करण्यात आल्याचा रयत सेनेकडुन निषेध करण्यात आला असुन मुख्यमंत्र्यांनी अन्यायग्रस्त मराठी भाग महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करून कर्नाटकातील मराठी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली असुन तशा आशयाचे निवेदन दि २८ रोजी तहसिलदार चाळीसगाव यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की कर्नाटक मध्ये मराठी बांधव मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत त्या ठिकाणी सिमा प्रश्नावरून गेल्या ६० वर्षांपासून मराठी बांधवांचा लढा सुरू असून ६० वर्षापासून कन्नडी भाषीक मराठी बांधवांवर अन्यायच करत आहे. कानडी सरकारच्या गोळ्या आणि लाठ्या काठ्याच खात आहे पण सिमालढा काही थांबला नाही कारण तो सत्य आणि न्यायाचा लढा आहे बेळगांव, कारवार ,भालकी ,निपाणी मधील मराठी भाषीकांचा महाराष्ट्रात येण्यासाठीचा हा लढा आजचा नाही तो साठ वर्षांहुन जास्त जुना आहे हे लढले चिरडले रक्तपात केला सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबातून नव्या लढ्याची प्रेरणा मराठी बांधवांना मिळाली आहे . मराठी भाषिक भाग हा महाराष्ट्रात सामावून घ्यावा यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहेत मात्र मराठी माणसांना चिरडण्याचे व भरडण्याचे प्रयत्न गेल्या ६० वर्षांपासून सुरू आहे त्या सर्व आघोरी प्रयोगाना सिमा भागातील जनता पुरुन उरल्याने व महाराष्ट्र एकीकरण समितीने न्याय मागणीसाठी पाठपुरावा सुरुच ठेवल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचा आवाज दाबण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावच्या सीमेवर थाबवुन गोळ्या घालण्याची भाषा ज्यांनी केली त्यांनी आधी आमच्या सिमा पार करून एक पाऊल पुढे टाकण्याची हिम्मत दाखवावी . महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ अंगावर आल्यावर येणाऱ्याचा कसा फडशा पाडतात ते समजेल म्हणून धमकी देणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेचा भीमाशंकर पाटील यांचा आम्ही जाहीर निषेध करीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्यायग्रस्त मराठी भाग महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करून कर्नाटकातील मराठी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी करुन यापुढे मराठी बांधवांवर कर्नाटक सीमा भागात अन्याय झाल्यास महाराष्ट्रातील मराठी बांधवांसह रयत सेना रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देऊन तिव्र आंदोलन छेडेल असा ईशारा देण्यात आला आहे. माहितीच्या प्रती गृहमंत्री म रा मुंबई, जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, शहर पोलिस
निरीक्षक चाळीसगाव यांना देण्यात आल्या आहेत.निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,खुशाल पाटील, भाऊसाहेब सोमवंशी, प्रताप देशमुख ,संजय कापसे, ज्ञानेश्वर कोल्हे, सुनील पाटील, मुकुंद पवार,बंडू पगार, प्रदीप मराठे , दीपक देशमुख ,सुनील निंबाळकर, हेमंत पाटील, दर्शन कापसे ,स्वप्निल गायकवाड ,छोटू अहिरे ,योगेश पाटील, रवींद्र पाटील
आदींच्या सह्या आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button