माळशिस येथील समाध्या वाघमोडे घराण्यातीलच..
– प्रा संतोष पिंगळे
मरहट्टे इतिहास संशोधकांच्या दावा
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे– माळशिरस येथील शिवाजी महाराज यांचे जावई व मुलगी यांच्या समाधी असल्याचे काही इतिहासकार सांगत आहेत.मात्र मरहट्टे इतिहास संशोधकांच्या संशोधना नुसार या समाध्या वाघमोडे घराण्यातील वीर पुरुषांची असल्याचे ते संशोधना अंती सांगात आहेत.त्यामुळे या समाध्या नेमक्या कुणाच्या हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. सरंजामी मरहट्टे या पुस्तकाचे लेखक प्रा संतोष पिंगळे यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, माळशिरस या गावावर अनेक वर्ष वाघमोडे घराण्याचा अंमल होता. हे गाव वाघमोडे सरदारांना सरंजामात दिल्याच्या नोंदी आहेत. समाधीची जागा व परिसरातील काही समाध्या व इतिहासाच्या आधारे या गावचा सरंजाम असणाऱ्या सरदारांची असावी. याशिवाय या वास्तुच्या पाहणी वरूण या विविध कालखंडात बांधण्यात आलेल्या असाव्यात मात्र या समाध्या नेमक्या कोणाच्या आहेत हे सांगण्यासाठी अधिक संशोधन करणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले.

सध्या उपलब्ध असणाऱ्या संशोधनाच्या आधारे या समाध्या वाघमोडे घराण्याशी निगडित असणाऱ्या वीर पुरुषांच्या आहेत हे नक्की आहे. मात्र यासबंधी भविष्यात हि कोणी अधिक संशोधन करुन नवे संदर्भ दिल्यास ते सर्वानुमते स्वीकारले जाईल असा खुलासा यावेळी त्यांनी केला. यावेळी उपनगराध्यक्ष मारूती पाटील ,आप्पासाहेब देशमुख ,गजानन पाटील , प्रताप पाटील , संदिप पाटील, अॅड. संग्राम पाटील , पांडुरंग वाघमोडे , अॅड. आप्पासाहेब वाघमोडे , डॉ.मोहन वाघमोडे, एन डी पाटील , डॉ.दिलीप वाघमोडे , वामन सिद , सोपान काका नारनवर ,बाळासाहेब सरगर, ॲड .शरद मदने, अॅड. प्रशांत बिचुकले आदी मान्यवर उपस्थीत होते .

माळशिरसला नुकतीच या समाधीलामरहट्टी संशोधक मंडळाच्या पथकाने भेट देऊन शहरातील नागरिकांबरोबर चर्चा केली. यामध्ये ही समाधी वाघमोडे घराण्याशी निगडित असल्याचा दावा करण्यात आला आहे . या पथकामध्ये सुरेश महानवर ,प्रा संतोष पिंगळे, सुमित लोखंडे, मधुकर हांडे, दिलीपराव माने ,श्रीकांत हंडाळ, विठ्ठल सोडनवर ,सिद्धाराम वाघमोडे ,, दादा लोखंडे, ज्ञानेश्वर वाघमोडे ,राजेश पाटील, विजय रुपनवर ,मयूर सूळ आधी अभ्यासकांचा समावेश होता.
माळशिरस गावाच्या बाबतीत खुद्द माळशिरस व आसपासच्या काही गावात. वाघमोडे सरदारांना जहागिरी , सरंजाम दिल्याचा उल्लेख असून या परीसरात आजही वाघमोडे, वाघमोडे -देशमुख, वाघमोडे -पाटील या आडनावाची घराणी अस्तित्वात आहेत. त्यामुळे या समाधीबाबतचे इतिहास संशोधकांना मधील मतभिन्नता वाढत चालली असून या समाधी बाबत ठोस पुरावा सापडल्या शिवाय ठाम इतिहास पुढे येणार नाही.






