कोरोनाने मृत झालेल्या शिक्षकांच्या वारसांना इंदापूर शिक्षक पतसंस्थेची २० लाखांची मदत
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : इंदापूर तालुक्यातील संतोष खुटाळे व सोपान कांबळे या दोन प्राथमिक शिक्षकांचे कोरोनाने काही दिवसांपूर्वी निधन झाले.त्यांचे कुटूंबियांना आधार देण्यासाठी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था उभी राहिली.इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेने आपल्या शिक्षक सभासदांसाठी असलेल्या शिक्षक कल्याण निधीतुन संतोष खुटाळे यांच्या पत्नी सविता संतोष खुटाळे यांना व सोपान कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा सोपान कांबळे यांना प्रत्येकी १० लाख रुपये चा धनादेश आज दिला.
शिक्षक पतसंस्थेचे सभापती सुनिल वाघ ,उपसभापती वसंत फलफले यांचे हस्ते व माजी सभापती किरण म्हेत्रे,माजी सभापती संभाजी काळे,माजी सभापती सुनिल शिंदे ,माजी सभापती विलास शिंदे, माजी सभापती मोहन भगत, माजी उपसभापती दत्तात्रय ठोंबरे,संचालक आदिनाथ धायगुडे,संचालक बालाजी कलवले,तज्ज्ञ संचालक सुनिल चव्हाण,सचिव संजय लोहार,माजी तज्ज्ञ संचालक भारत ननवरे,शिक्षक नेते सयाजी येवले, शिक्षक समितीचे नेते प्रविण धाईंजे,प्रताप शिरसट,सदाशिव रणदिवे यांचे उपस्थितीत धनादेश दिला.
इंदापूर शिक्षक सहकारी पतसंस्था सदैव आपल्या शिक्षक सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते.संस्थेचे सर्व सभासदांचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला आहे.तसेच शिक्षक सभासदाचे कोणत्याही कारणाने निधन झालेस त्या शिक्षकांच्या कायदेशीर वारसास शिक्षक कल्याण निधीतुन १० लाखांची मदत तात्काळ व तत्परतेने दिली जाते.या मदतीमुळे शिक्षक कुटूंबास मोठा आर्थिक आधार मिळत असल्याने सभासदांमधुन समाधान व्यक्त केले जाते.शिक्षक कल्याण निधीतुन शिक्षक सभासदांना विविध आजारासाठी तात्काळ ५० हजारांची मदत दिली जाते.






