पत्रकार, पोलिसांचे विकासात मोठे योगदान :
मनोज पाटील
जिल्हाप्रतिनिधी पुणे
:कोणत्याही शहर-जिल्ह्याचा विकास होण्यासाठी कायदा आणि शांतता खूप महत्वाची असून त्यासाठी पोलिसांच्या बरोबरीने पत्रकार देखील जबाबदारी पार पाडतात म्हणून विकासात पत्रकार आणि पोलिसांचे योगदान खूप मोठे असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज येथे केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे दिलेल्या जाणार्या आदर्श पत्रका पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. अक्क्लकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजेयराजे भोसले, दयानंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. किर्ती पांडे, मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, माजी लायन प्रांतपाल अरविंद कोणशिरसगी, रोटरी असिस्टंट गव्हर्नर राकेश उदगिरी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदींच्या हस्ते सोलापुरातील पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पोलिस अधीक्षक पाटील पुढे म्हणाले, पोलिस आणि पत्रकारांच्या कार्यपध्दतीत मोठे साम्य आहे. कामाच्या वेळा निश्चित नसतात. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या विविध कार्यालयांच्या कामकाजांचे योग्य मूल्यमापन पत्रकारांकडून केले जाते. पत्रकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे मोलाचे काम श्रीमंतयोगी प्रतिष्ठानने केले आहे. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. पांडे म्हणाल्या, पुरस्काराने पत्रकारांची जबाबदारी आणखीन वाढते. यापुढे त्यांनी समाज जाकरूकतेसह साक्षर करण्यासाठी कार्य करावे. अन्नछत्र मंडळाचे भोसले म्हणाले, पोलिस आणि पत्रकारांचे काम मोलाचे असते. पोलिस अधीक्षकांनी अक्कलकोट अन्नछत्र मंडळासाठी पोलिस चौकी सुरु केली आहे. श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कार्यास हातभार म्हणून आपण दहा विद्यार्थी दत्तक घेत आहोत.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कासट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शोभा घंटे, रुपा कुत्ताते, पदमा वेळापुरे, सुवर्ण शहा, सुजाता सक्करगी, शुभांगी लचके, माधुरी चव्हाण, संतोष अलकुंटे, अक्षय यरगल, कल्याण करजंगी, मयुर गवते, शंकर बंडगर, शुभर हंचाटे, विजय छंचुरे, दिपक बुलबुले, पप्पू जमादार, प्रसाद मोहिते, साहेबराव परबत, संतोष धाकपडे, ईरफान सय्यद, विजय जाधव, रमेश जाधव, विनोद करपेकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मल्लेश पुरवंत यांनी तर आभार प्रा. गणेश लेंगरे यांनी मानले.
● हे आहेत पुरस्काराचे मानकरी
प्रशांत माने(पुढारी), अनिल कदम(संचार), उमेश कदम(दिव्यमराठी) संजय शिंदे(लोकमत), तात्या लांडगे(सकाळ), कुष्णकांत चव्हाण(पुण्यनगरी),विशाल भांगे(बी.आर.न्युज), रोहन श्रीराम (अस्मिता न्युज चँनल) आदि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल सन्माचिन्ह सम्मानपत्र व पुष्पगुच्छ आहे.






