Yawatmal

जिल्हा परिषद शाळा आटमुरडी येथील ध्वजारोहण कार्यक्रमात गावकर्यां समोर  शिक्षकांमध्ये आपसात वाद

जिल्हा परिषद शाळा आटमुरडी येथील ध्वजारोहण कार्यक्रमात गावकर्यां समोर शिक्षकांमध्ये आपसात वाद

राळेगाव यवतमाळ विशाल मासुरकर

आज दिनांक 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करतेवेळेस यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा आटमुरडी येतील सहाय्यक शिक्षक देशमुख यांनी विद्यार्थी व गावकऱ्या समोर बेजबाबदारपणाचे भाषण व संचालन केले, त्यामुळे शाळेतील भ्रष्ट्राचार बाहेर आल्याने शिक्षका मध्ये वाद झाला.

शाळेचे मुख्याध्यापक झाडे सर व इतर शिक्षक हे शालेय पोषण आहार, शाळेचा भौतिक परिस्थिती, विद्यार्थ्यांना न शिकवणे, तासिकेच्या वेळी मोबाईलवर खेळत बसने, शाळेवर न येता;एकाच दिवशी मागील दिवसांच्या सह्या मारणे,अशा पद्धतीने एकमेकांवर व मुख्याध्यापकांवर शाळेतील शिक्षकांनी आपापसात आरोप केले.

शालेय पोषण आहारात पूरक आहार हा व्यवस्थित मिळत नाही, तसेच तांदूळ डाळ, तेल व इतर अत्यावश्यक सामग्री ही मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली आढळून आलेली दिसली. यामध्ये शाळेत गावकऱ्यांनी सर्व गोष्टींची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला आणि शाळेतील शिक्षक झिल्पे व . देशमुख यांच्यात मोठी खडाजंगी आणि वाद झाला.
आटमुरडी शाळेतील शिक्षक हे शिक्षकाला न शोभणारे वर्तन तेही प्रजासत्ताकदिनी शाळेत करत आहे असे निदर्शनात आले आहे. यावर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी गावकर्‍यांची मागणी आहे आहे अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे, या वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. मंजुषा चिडे, सरपंच सौ.लक्ष्मी वाघदरे, गावातील पोलीस पाटील हरिदास पाटील गावातील मान्यवर मंडळी व सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button