Maharashtra

प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा — जिल्हाधिकारी शंभरकर

प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा

— जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर दि. 25 : – प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असणारे स्मार्ट कार्ड तयार करुन घ्यावे. हे कार्ड तयार करण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत श्री. शंभरकर यांनी सूचना दिल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा शल्यचिकित्यक प्रदीप ढेले, तालुका आरोग्यधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

या योजनेचे लाभार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत. ग्रामीण क्षेत्रात तालुका आरोग्याधिकारी, नगरपालिका क्षेत्रांत मुख्याधिकारी आणि महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्यक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे.

· योजनेस पात्र कोण ठरेल : 2011 मध्ये करण्यात आलेल्या आर्थिक जातनिहाय सर्व्हेक्षण मधील कुटुंबे.

· लाभ काय मिळेल: पात्र लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

आवश्यक कागदपत्रे– योजनेचे ई – कार्ड

· ई कार्ड बनविण्याकरिता : रेशनकार्ड किंवा प्रधानमंत्री यांचे कुटुंबास प्राप्त पत्र, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक.

· रुग्णालये : लाभार्थ्यांस योजनेत समावेश असलेल्या देशभरातील कोणत्याही रुग्णालयात लाभ घेता येईल.

· ई – कार्ड कोठे बनवून मिळेल : ग्रामपंचायत कार्यालय, आपले सरकार केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर. ई-कार्ड बनवण्यासाठी तीस रुपये आकारले जातील. मात्र योजनेत सहभागी रुग्णालयांत मोफत ई –कार्ड बनवून मिळेल. पात्र कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे वेगवेगळे ई – कार्ड बनवावे लागेल.

· योजनेत समाविष्ट जिल्ह्यातील रुग्णालये : अकलूज क्रिटीकल केअर ॲण्ड ट्रामा सेंटर, आश्विनी रुरल कॅन्‍सर रिसर्च ॲण्ड रिलीफ सोसायटी, आश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर, डॉ.चिडगुपकर हॉस्पिटल , डॉ. कासलिवाल मेडिकल केअर ॲण्ड रिसर्च फांउडेशन, कासलिवाल हॉस्पिटल, डॉ. रघोजी किडनी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, देवडीकर मेडीकल सेंटर, धनराज गिरजी हॉस्पिटल, जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर, लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर, नवजीवन चिल्ड्रन हॉस्पिटल, पंढरपूर, सेवा हॉस्पिटल, समर्थ हॉस्पिटल पंढरपूर, श्री गणपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर, सुविधा आयसीयु ॲण्ड कॅथलॅब सेंटर , युगंधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button