Mumbai

ठाकरे सरकार’मधील ‘या’ 7 मंत्र्यांना नाही, कुठल्याच जिल्ह्याचं “पालकत्व”

ठाकरे सरकार’मधील ‘या’ 7 मंत्र्यांना नाही, कुठल्याच जिल्ह्याचं “पालकत्व”….

प्रतिनिधी दत्ता पारेकर
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार, ठाकरे सरकारमधील 43 मंत्र्यांपैकी 7 मंत्र्यांना कुठल्याही जिल्ह्याचं पाकलमंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे, ते राज्याचे मंत्री बनूनच त्या जिल्ह्याचा कार्यभार पाहणार आहेत.

सरकारने जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीनुसार राज्यातील 17 मंत्र्यांना त्यांच्याच जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले आहे. त्यात अमरावती, बीड, बुलढाणा. चंद्रपूर, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, ठाणे आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर, उर्वरित 19 जिल्ह्यांना बाहेरचे पालकमंत्री मिळाले आहेत. तसेच, 7 मंत्री हे पालकमंत्री पदापासून वंचित आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या 4, काँग्रेसच्या 1 आणि शिवसेनेच्या दोन नेत्यांचा समावेश आहे. त्यापैकी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही पालकमंत्रपदाची संधी मिळाली नाही.
या 7 मंत्र्यांना कोणताही जिल्हा मिळालेला नाही

1 तनपुरे प्राजक्त (राकाँ)
2 आव्हाड जितेंद्र (राकाँ)
3 पाटील राजेंद्र (अपक्ष)
4 भरणे दत्तात्रय (राकाँ)
5 कदम विश्वजीत (काँग्रेस)
6 भुमरे संदीपानराव (शिवसेना)
7 बनसोडे संजय (राकाँ)

यापैकी, तनपुरे (अहमदनगर) आणि भुमरे (औरंगाबाद) यांच्या जिल्ह्यात बाहेरचा पालकमंत्री देण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button