Kolhapur

अवयवदान ही लोकचळवळ बनावी – पुरुषोत्तम पवार

अवयवदान ही लोकचळवळ बनावी – पुरुषोत्तम पवार

राजेश सोनुने

कोल्हापूर – रक्तदान , नेत्रदानप्रमाणेच समाजात अवयवदान ही चळवळ लोकचळवळ होणे गरजेचे आहे . एका व्यक्तिच्या मृत्यू पश्चात अवयवदानाने तब्बल सात व्यक्तिना जीवदान लाभते . भारतात अवयवदानाचे प्रमाण अवघे साडेतीन टक्के आहे . यामध्ये गतीने वाढ होण्यासाठ वैद्यकीय प्रशासकीय आणि स्वयंसेवी संघटनांनी एकत्रित प्रयत्न करावेत अशी अपेक्षा द फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी संस्थापक सदस्य पुरूषोत्तम पवार यांनी व्यक्त केले .

अवयवदान ही लोकचळवळ बनावी - पुरुषोत्तम पवार

नाशिक ते बेळगांव अवयवदान प्रबोधन पदयात्रा अंतर्गत गुरूवारी कोल्हापुरात सीपीआर जिल्हा शासकीय रूग्णालयात नर्सिंग स्कूलच्या सभागृहात त्यांनी आपले अनुभवपर हितगुज व्यक्त केले . आपला शेजारी आणि आपल्या देशाच्या एका राज्याएवढा असणारा श्रीलंका देश हा आशिया खंडासह निम्म्या जगाला डोळे पुरवतो . हा आदर्श आपण घेतला पाहिजे . सध्या आधुनिक वैद्यकीय विज्ञानामुळे दोन दान केलेल्या डोळ्यातून पाच ते सहा जणांना दृष्टी मिळू शकते . असे सांगून पवार यांनी अवयवदानामध्ये नातेवाईक आणि निकटवर्तीयाचेही प्रबोधन गरजेचे आहे . तसेच त्याच अभ्यास सर्वांना गरजेचा आहे , असेही त्यांनी नमूद केले .

अवयवदान ही लोकचळवळ बनावी - पुरुषोत्तम पवार

सचिव सुजित बागाईदार यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करत वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी युवापिढीने एक सामाजिक दायीत्व म्हणून अवयवदानामध्ये अभ्यासपूर्वक प्रबोधन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी सर्वांचे स्वागत नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या बी . एस . मोमीन यांनी केले . तर प्रास्ताविक प्राध्यापिका भाग्यश्री विजय शहा यांनी केले . पाहुण्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय , स्वयंसेवी आणि खाजगी वैद्यकीय क्षेत्राच्या एक हजार संपर्क फोन नबर असणाऱ्या आरोग्य दिनदर्शिका सप्रेम भेट राजेंद्र मकोटे यांनी दिल्या . यावेळी शहर समन्वयक योगेश आगरवाल , पंढरीनाथ मांडरे आदींसह प्रत्यक्ष अवयवदानाचा लाभ घेतलेले आणि नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीनी स्थित होत्या . यासह स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मुख्यालयातील नर्सिंग स्कूलसह साळोखेनगर येथील डॉ . डी . वाय . पाटील , पॉलिटेक्निक मध्येही प्रबोधन व्याख्यान संपन्न झाले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button