सरदार वल्लभभाई पटेल याचे स्मारक बनावे म्हणून तीन दिवस उपोषण सत्याग्रह
हुलसूर/प्रतिनिधी-महेश हुलसूरकर
हुलसूर तालुक्यातील गोरटा (बी) याठिकाणी जालीयणवाला बाग मध्ये ज्या पद्धतीने हात्याकांड घडले व त्यामध्ये कित्येक जणांचे त्यावेळी बळी गेले होते त्याचप्रमाणे हुलसूर तालुक्यातील गोरटा(बी) येथे ही २०० जण हुतात्मे झाले होते त्यामुळे हैद्राबाद कर्नाटक मुक्ती संग्राम दि.१७ सप्टेंबर २०१४ मध्ये बीजीपी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गोरटा(बी) येथे येवून या स्मारकाचे भूमीपूजन केले व लाखो नागरिका समोर गोरटा मध्ये भव्य राष्ट्रीय स्मारक व सरदार वल्लभभाई पटेल याची मुर्तीचे अनावरण करु असे अश्वासन दिले व २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल मुर्ती व स्मारकाचे उदघाटन करीत असे ही अश्वासन दिली होते पण आज सहा वर्षे पूर्ण झाले तरीही अद्याप याठिकाणी काहीच न झाल्याने विश्व क्रांती अध्यक्ष ओमप्रकाश रोट्टे यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस १५,१६,१७ स्मारक परिसरात उपोषणाला बसले आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस एडीयुरप्पा हे १७ सप्टेंबर रोजी कलबुर्गी येथे ध्वजारोहण करण्यासाठी येत आहेत त्यामुळे त्यांनी या स्मारकला भेट देऊन पाहणी करावी व लवकरात लवकर या स्मारकाचे काम सुरू करावे ओमप्रकाश रोट्टे यांनी मागणी करीत आहेत.
हैद्राबाद कर्नाटक मुक्ती संग्राम हे नाव बदलून नवीन नामकरण बी एस एडीयुरप्पा यांनी कल्याण कर्नाटक मुक्ती संग्राम दिन म्हणून सहा महिने खाली केले आहे
दि.१५ रोजी गोरटा(बी) सकाळी श्री महालक्ष्मी मंदिरापासून ते स्मारक पर्यंत मिरवणूक काढण्यात आली व स्मारक परिसरात उपोषणाला बसले आहेत.






