Amalner

शांतीनिकेतन शाळेत सावित्रीमाई फुले जयंती साजरी

शांतीनिकेतन शाळेत सावित्रीमाई फुले जयंती साजरी

अमळनेर प्रतिनिधी
येथील शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर शाळेत ३ जानेवारी रोजी सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर यांच्या हस्ते सावित्रीमाई फुलेंच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकांनी प्रतिमा पूजन केले शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सावित्रीमाई फुले यांच्यावर भाषणे दिली अध्यक्षीय मनोगतात कापडणेकर मॅडम म्हणाल्या की , सावित्रीमाई फुलेंचं कार्य बहुजन समाजातील स्त्री मुक्तीसाठी समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी असून त्यांनी केलेल्या त्यागामुळेचं आजच्या स्त्रियांना समाजात मान असे प्रतिपादन केले.यावेळी उपस्थित शिक्षकांनीही सावित्रीमाई फुलेंच्या कार्यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर, शिक्षक यशवंत सुर्यवंशी सर, योगेश शिरूडे सर जयवंत पाटील सर,श्रीमती सविता साळवे मॅडम,सौ.स्नेहल शिसोदे मॅडम ,अजय भामरे सर, के.के पाटील सर, शिवाजी मोरे सर, स्वप्निल पाटील सर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय भामरे सर यांनी केले तर आभार स्वप्निल पाटील सर यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button