चिमणराव पाटील विजयी
कमलेश चौधरी
एरंडोल-पारोळा-भडगाव विधानसभा मतदारसंघात चुरसीची लढत पहायला मिळाली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आमदार डाँ. सतिश भास्करराव पाटील. शिवसेनेकडुन माजी आमदार चिमणराव रूपचंद पाटील,व भाजपा तर्फे माजी जि. प. उपाध्यक्ष मच्छिंद्र रतनजी पाटील,परंतु युती झाल्यामुळे पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार व दोघांनी युती झाल्यामुळे जागा सेनेला सुटल्यामुळे दोघांनी चिमणराव पाटील यांना मोठ्या प्रमाणात मदत केली व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंदराव एकनाथ शिरोळे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी केली . व शिवसेना व भाजपाची युती झाली.चिमणराव रूपचंद पाटील याना शिवसेनेकडुन उमेदवारी मिळाली व. युती न झाल्यास भाजपची तिघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली असती मच्छिंद्र पाटील व करण पवार यांची नावे त्यासाठी चर्चेत होती . परंतु युती झाल्यामुळे माजी आमदार चिमणराव पाटील यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाले .
तर मनसेकडून विशाल सोनार हे
तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. भाजपकडून पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार हे देखील निवडणुकीच्या रिगणात उतरण्याचा तयारीत होते. युती झाली तर शिवसेनेचे चिमणराव पाटील हे उमेदवारअसतील. नाहीतर भाजपाकडून करण पवार हे प्रबळ
दावेदार होते. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने २१ तारखेला विधानसभा निवडणूक जाहीर केली होती मात्र निवडणूक जवळ आली तरी
मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलेला दिसत नव्हता.
आजच्या घडीला राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकमेव विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील होते. डॉ. सतीश पाटील यांच्यासमोर माजी आमदार चिमणराव पाटील हेच प्रमुख
उमेदवार होते. मागील निवडणुकीत मनसे व भाजपाने जोरदार टक्कर दिली होती. परंतू यावेळी मनसेचे अस्तित्व
डळमळीत दिसले. त्यामुळे सतिश पाटील व चिमणराव पाटील यांच्यातच काट्याची लढत झाली. यावेळी युती झाल्यास चिमणराव पाटील यांच्यासमोर भाजपचा उमेदवार नसेल. त्यामुळे त्यांना भाजपची पारंपारिक मते मिळाली तर दुसरीकडे गोविंद
शिरोडे हे देखील निवडणूक रिंगणात उतरले त्यांनी२४ हजार ३३८मतदान खाल्ले .
व ते नेमके कोणत्या पक्षाचे खाल्ले नेमका विचार करण्यासारखी गोष्ट आहे .
पारोळा,एरंडोल,भडगाव विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०१९या निवडणुकी साठी मतदान सोमवार दिनांक २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी सकाळी ०७वाजेपासून ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत करण्यात आले.या मतदारसंघात एकूण दोन लाख ७९हजार ५५७मतदार असून१लाख ७६ हजार ३८० मतदारांनी मतदान केले.त्या मतदानाचा निकाल हा दिनांक २४ रोजी एरंडोल तरण तलाव म्हसावद रोड या ठिकाणी २१ फेऱ्यात हा निकल लावण्यात आला. एरंडोल मतदारसंघात एकूण दोन लाख ७९हजार ५५७ इतके मतदार असून १ लाख ७६ हजार ३८० मतदारांनी मतदान केले त्यापैकी चिमण पाटील यांना ८२हजार ६५०, तर राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांना ६४ हजार ६४८, बहुजन समाज पार्टीचे संजय लोखंडे यांना ६३५,बहुजन आघाडी पार्टीचे गौतम पवार यांना २ हजार ३०३,आबासो चिमणराव पाटील यांना २५८,प्रतापराव पवार यांना ५०६,राहुल पाटील यांना ७९३, शिरोळे गोविंद एकनाथ यांना २४ हजार ५८७ अशी मतं मिळाली असून वाया गेलेले मतदान (नोटा )१९९६ रिजेक्ट मतदान १३असून चिमणराव पाटील यांनी१८००२ इतक्या मतांनी सतीश पाटील यांचा पराभव केला.निवडणूक अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी कर्तव्य बजावले.






