Lonand

जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

दिलीप वाघमारे

साथ प्रतिष्ठाण, लोणंद पोलिस स्टेशन व मालोजीराजे विद्यालय लोणंद संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या भव्य जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
प्रथम क्रमांक – श्रीकृष्ण क्रीडा मंडळ सातारा.
द्वितीय क्रमांक – मसूर क्रीडा मंडळ मसूर
तृतीय क्रमांक – साखरवाडी क्रीडा मंडळ साखरवाडी
चतुर्थ क्रमांक- साथ प्रतिष्ठान क्रीडा मंडळ लोणंद यांना अनुक्रमे रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी साथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष कय्युम मुल्ला, युवा उद्योजक शनेश्वर डोईफोडे, पत्रकार मंगेश माने, लोणंद शिवसेना उपशहरप्रमुख हेमंत आप्पा पवार, ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मणराव जाधव तात्या, दिपक भाटे, वैभव धायगुडे, तसेच सर्व विजेत्या संघाचे खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button