Paranda

वाळू माफियांविरुद्ध महसूलची धडक कारवाई दोन वाळू चोर ताब्यात..

वाळू माफियांविरुद्ध महसूलची धडक कारवाई दोन वाळू चोर ताब्यात..

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि.१५

परंडा पोलिसांनी तालूक्यातील वाळू चोरांच्या मुसक्या आवळन्यास सुरुवात केल्याने महसुल विभाग खडबडून जागे झाले असून नायब तहसिलदार सुजित वाबळे यांच्या पथकाने दि १५ फेब्रुवारी रोजी वाळूची चोरी करून अवैध वाहतुक करीत असताना सोनारी रोडवर एक टिप्पर तर देवगाव ( खुर्द ) येथे एक टॅक्टर पकडल्याने वाळू चोरात खळबळ उडाली आहे .

परंडा तहसिल कार्यालयाचे अवैध गौण खनिज विरोधी पथकाने दि १५ फेब्रुवारी रोजी पहाटे डोमगाव येथिल संतोष साबळे यांचा विना नंबर चा टिप्पर वाळू चोरी करून अवैध वाहतूक करीत असताना परंडा सोनारी रोडवर पकडला आहे .
संतोष साबळे यांनी गेल्या वर्षी देवगाव येथील वाळू घाटाचा ठेका घेतला होता , ठेकेदार यांच्या टिप्पर मधुन वाळू चोरी करून वाहतूक करीत असताना पथकाला सापडला आहे .

तर देवगाव खुर्द येथे शिराळा येथिल संदीप अर्जुन गिलबिले ,यांच्या मालकीचा टॅक्टर नंबर एम एच २५ एच २२०३ मधुन वाळू चोरी करून वाहतूक करीत असताना पथकाने सकाळी ७ वाजता पकडला महसुलच्या पथकाने एकाच दिवशी दोन वाळू चोरांना पकडून मोठी कारवाई केली आहे .

शिराळा येथिल टॅक्टर वर एम एच २५ ए एल ५०४७ असा बोगस नंबर
लावन्यात आला असल्याची माहिती पथकाने दिली आहे .

वाळूची चोरटी वाहतूक करनारा टिप्पर व टॅक्टर जप्त करून तहसिल कार्यालय परिसरात लावन्यात आला आहे .

परंडा तालूक्यातील विविध भागातील नदी पात्रातुन मोठया प्रमाणात वाळू चोरी होत आहे , मागील आठवड्यात तांदूळवाडी व करंजा येथे वाळू चोराकडून महसुल च्या पथकाला अरेरावी व धक्काबुक्की दगडफेक झाल्याची घटना घडली होती .या प्रकरणी अंभी पोलिसात दोघावर तर परंडा पोलिसात ७ असे एकुन ९ वाळू चोरावर परंडा पोलिसात गुन्हा दाखल करन्यात आला होता .

परंडा पोलिस पथकाने दि १३ फेबुवारी रोजी संध्याकाळी करंजा येथून वाळूची चोरी करून वाहतूक करीत असताना निखील शिंदे यास अटक केली होती .

परंडा तहसिलचे नायब तहसिलदार सुजित वाबळे, तलाठी विशाल खळदकर, चंद्रकांत कसाब, ज्ञानेश्वर गुळमिरे,. तुकाराम वाळके, विकास नागटिळक यांच्या पथकाने एकाच दिवशी दोन वाळू चोरावर कारवाई केली असल्याने तालूक्यातील वाळू चारांचे धाबे दनालले आहे .

महसूल विभाच्या दंडात्मक कारवाई कडे संपुर्ण तालूक्याचे लक्ष लागले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button