?️अमळनेर कट्टा…अमळनेर तालुक्यातील शाळांचे आर टी ई अनुदान तात्काळ मिळणेसाठी आमदारांना निवेदन
अमळनेर जिल्हयावरून मिळणाया आर टी ई अनूदान हे सर्व शाळांना वेळेत मिळायला हवे परंतू शासन स्तरावर ही वाव गंभिर घेतली जात नाही. त्यामळे सर्व संस्था चालक संस्था कशी चालवावी हया संभ्रमात आहेत.
आरटीई अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेशित राज्यातील शाळांची चार वर्षाची आरटीई प्रतिपुर्ती रक्कम मागणी सुमारे १८५० कोटी रूपये आहे त्यातील २४ मार्च रोजी फक्त ५0 कोटी रूपये वितरीत करण्यात आली . सन २०१९ .२० या वर्षात एकूण ३ लाख ५३ हजार ४०२ विधार्थी या योजनेत शिकत असून याकरीता एकूण प्रतिपूर्ती मागणी ६२४ कोटीची आहे . मात्र ५० कोटी रूपये देण्यात आले .
५० टक्केच रक्कम कशी काय वितरीत केली जाऊ शकते. असा सवाल आरटीई फाऊन्डेशन वतीने केला जात आहे . यापुर्वी २०१७ .१८ २०१९ . २० मध्ये चुकीची आकडेवारी सांगून कमी रक्कम दिली . जोपर्यंत शासन शाळांना आरटीई प्रतिपुर्ती रक्कम पुर्ण देण्याची तरतूद करणार नाही तो पर्यंत राज्यात खाजगी शाळा
आरटीई प्रवेश देणार नाही. प्रसंगी आमरण उपोषण केले जाईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सध्या कोरोना महामारीमुळे जी परिस्थिती सर्वांसमोर उभी ठाकली आहे ती सर्वश्रूत आहे. शाळा बंद आहेत त्यामुळे पालक फी देण्यावावतीत उदासिन आहेत . शिक्षकांचे पगार थकले आहेत ज्यांच्या इमारती भाडेतत्वावर घेतल्या आहेत त्यांचे भाडे थकले आहे . काही शाळांनी विधार्थी वाहतुकीसाठी वाहने घेतली आहेत त्यांचे हफ्ते थकले आहेत घेणेकरी संस्थाचालकांकडे तगादा लावत आहेत. त्यामूळे संस्थाचालकांची खुपच विकट अवस्था झाली आहे . आणि त्यातच या वर्षीचे आरटीई प्रवेश ३ मार्च पासून शासनाने आमच्यावर लादून एक प्रकारे आमच्या जखमावर मिठ चोळण्याचे काम केले आहे . जर आम्हास आरटीई विधार्थ्यांचा परतावाच मिळत नसेल तर त्या अॅडमिशन आम्ही का स्विकाराव्या असा प्रश्न निवेदन देतांना आरटीई फाऊन्डेशन च्या वतीने जिल्हा अध्यक्ष उत्कर्ष पवार, भटू पाटील, तुषार पाटील, अविनाश
पाटील,चंद्रकांत भदाणे यांनी केली आहे.






