एकतास, दापोरी व टाकरखेडा ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार अनिल पाटील यांची घेतली भेट. मतदारसंघात 21 ग्रा पं बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांचे मानले आभार.
विनोद जाधव अमळनेर
अमळनेर-तालुक्यातील एकतास, दापोरी व टाकरखेडा येथील ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी आमदार अनिल पाटील यांची भेट घेतली, त्यावेळी ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
आमदार अनिल पाटील यांनी यावेळी एकतास, दापोरी, टाकरखेडा सह सर्व मतदारसंघातील बिनविरोध गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची नवनिर्वाचित सदस्यांना हमी दिली. तसेच अमळनेर मतदारसंघात अमळनेर तालुक्यातील 15 आणि पारोळा तालुक्यातील 6 अशी 21 गावे बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांचे आभार मानून या गावांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.पारोळा तालुक्यातील बिनविरोध ग्रा प मध्ये दळवेल, जीराळी, इधवे, महाळपुर, भोलाने व वसंतनगर ग्रा पं चा समावेश आहे.
दरम्यान एकतास येथील ग्रामपंचायत सदस्य मिनाबाई रमेश पाटील, उषाबाई हिंमत पाटील, संजय आसाराम पाटील, मंगलाबाई दिलीप पाटील, वैशाली भानुदास भोई, गौतम सुका भिल, दगा राजेंद्र मोरे आदी आमदारांच्या भेटीसाठी उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजी सरपंच साहेबराव पाटील, लक्ष्मण बापू पाटील, पुनमचंद पाटील, योगेश पाटील, समधान शंकर पाटील, बापुराव नामदेव मोरे, विनोद धनराज नाथबुवा, भटु वाघ आदींनी अनमोल सहकार्य केले.
दापोरी येथील ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता मृणाल पाटील, हिरालाल शिवदास भिल, प्रियंका दिलीप पाटील, दर्शन दिलीप पाटील, राहुल पुंडलिक पाटील, प्रतिभा भिला पाटील, छाया आत्माराम भिल आदी उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजी सरपंच व कामगार नेते एल.टी. पाटील, विजय जिजाबराव पाटील, कैलास लहू पाटील, अरुण सहादू पाटील, दिलीप फकिरा पाटील, आर.एन.पाटील आदींनी अनमोल सहकार्य केले.
टाकरखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य अरुण गोकुळ पवार, मनीषा गुणवंत पाटील, विजया रामचंद्र सोनवणे, वैशाली जितेंद्र पाटील, प्रकाश धोंडू पाटील, किरण दिलीप पाटील, मीराबाई विश्वास पाटील, तबस्सुम जुम्मा पिंजारी, रामदास रूपसिंग भिल यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.






