Amalner

ग्रामीण भागात युरिया खताची चढ्याभावाने विक्री, शेतकऱ्याची लूट, कृषीअधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी

ग्रामीण भागात युरिया खताची चढ्याभावाने विक्री, शेतकऱ्याची लूट, कृषीअधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी

रजनीकांत पाटील

अमळनेर :- तालुक्यात कोरोना चे संक्रमण पाहता आधीच शेतकरी एक कसरत करीत आपले जीवन जगत आहे त्यात त्याला मोठया अडचणींना देखील सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्याचा विचार केला जात नसून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांकडे व तक्रारींकडे समंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे.

कोरोनाच्या आलेल्या महाभयंकर संकटात देखील तालुक्यातील शेतकरी वर्गाची बोगस बियाणे, बोगस फवारणी व तणनाशके यांत मोठी फसवणूक होत आहे. पिके आता डोलायला लागली असून त्यांची वाढ व्हावी म्हणून युरीया खताची गरज आहे यात ग्रामीण भागातील कृषिकेंद्र धारक युरिया ची विक्री जादा दराने करत आहे कींवा दुकानातील ईतर काहि मटेरीयल घेतले तरच युरीया मिळेल अशी तंबी देण्यात येत आहे.यात कुणालाही पक्के बिल न देता अव्वाच्या सव्वा भावाने हे खत विकले जात आहे.अडचणीत आलेला शेतकरी नाईलाजाने जादा पैसे देऊन घेत आहे.

कृषीकेंद्रचालक आपला खिसा भरत आहे, त्यात कोणी जबरदस्तीने बिल मागितले असता त्याला युरीया दिला जात नसून त्याला शिल्लक नाही असे उत्तर देऊन बाजूला सरकविले जात आहे या बाबत ची कोणीही दखल घेत नसुन गरीब व हतबल शेतकरी यात भरडला जात आहे. कृषीअधिकारी यांनी लक्ष देऊन शेतकरी समस्यामुक्त करावा अशी मागणी ग्रामीण भागात जोर धरु लागली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button