Nashik

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ भारतीताई पवार यांचे कडे जनता नागरी सह पतसंस्था येवला या संस्थे विरोधात ठेवीदारांची तक्रार

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ भारतीताई पवार यांचे कडे जनता नागरी सह पतसंस्था येवला या संस्थे विरोधात ठेवीदारांची तक्रार

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

नासिक जिल्ह्यातील येवला येथील जनता सह पतसंस्था या संस्थेचे मनमाड येथील कार्यालय 10 ऑगस्ट 2020 पासून पूर्ण पणे बंद करण्यात आले असून मनमाड शहर व परिसरातील सुमारे 300 पेक्षा जास्त ठेवी दारांचे अंदाजे रुपये रक्कम 01 कोटी 90 लाख रुपये च्या ठेवी व अल्पबचत गुंतवणूक ची रक्कम देण्यासाठी पतसंस्था टाळाटाळ करीत आहे या मध्ये सर्वात जास्त जेष्ठ नागरिक ,व्यापारी ,छोटे दुकानदार यांची रक्कम अडकली असून येवला तालुका सह पतसंस्था निबंधक व नासिक जिल्हा सह निबंधक यांनी देखील या ठेवीदारांचे समस्या कडे पूर्ण पणे दुर्लक्ष केले आहे याबाबत आज भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी ,शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे,यांचे नेतृत्व मध्ये या पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आणि या संस्थे च्या अल्पबचत प्रतिनिधी नी भाजपा नेत्या आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय डॉ सौ भारतीताई पवार यांची भेट घेतली आणि या जनता नागरी पतसंस्था येवला यांचे विरोधात लेखी तक्रार केली ह्या वेळी अनेक ठेवीदारांनी या संस्थेच्या गैरकारभारविरुद्ध तक्रारी चा पाढा केंद्रीय मंत्र्यांन पुढे वाचला या संस्थेच्या चार शाखा असून त्या पैकी दोन सुरू आहेत आणि दोन बंद आहेत संस्था संचालक मंडळ विनाकारण ठेवीदारांच्या ठेवी ची रक्कम अडवत असल्याचे नितिन पांडे आणि जयकुमार फुलवाणी यांनी ठेवीदाराची बाजु मांडताना सांगितले सध्या कोरोना संकट काळा मध्ये या पतसंस्थेने बेकायदेशीर रीत्या ठेवीदारांच्या रक्कम थांबवून ठेवल्यामुळे अनेक ठेवीदारांची विशेष तहा जेष्ठ नागरिकांन ची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे अल्पबचत प्रतिनिधी संदीप सांगळे ,प्रदीप धिवर यांनी देखील या प्रसंगी ठेवीदारांच्या अडचणी सांगितल्या अत्यंत व्यस्त नियोजन असताना देखील केंद्रीय मंत्री डॉ भारतीताई पवार यांनी या संकटग्रस्त ठेवीदार व अल्पबचत प्रतिनिधी शी संवाद केला व त्याच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि राज्य सरकार च्या वरीष्ठ सहकार अधिकाऱ्यांशी बोलून या ठेवीदारांच्या रक्कम मिळवून देणे साठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले या प्रसंगी कामगार नेते राजाभाऊ पवार,भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी, भाजपा चे शहर उपाध्यक्ष बुधन बाबा शेख ,अनंता भामरे,प्रमोद जाधव ,भाजपा दिव्यांग आघाडी चे शहर अध्यक्ष दीपक पगारे गणेश गंडी,रवींद्र सोनार,संदीप उमाळे,गंगाधर भावे,चेतन सरोदे,मोहन शाकदिपी, कैलास कवडे प्रवीण जाधव,राम थोरात,धनंजय देशपांडे, प्रियंका धोंडगेआदी प्रमुखा नसह मोठ्या संख्येने ठेवीदार उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button