Pune

प्रविण माने यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद ; इंदापूरात २२७ बॅगचे संकलन

प्रविण माने यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद ;
इंदापूरात २२७ बॅगचे संकलन

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या, प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, लोकांना घराबाहेर निघणे अशक्य झाले असून, देशांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याबात विनंती केली होती. इंदापूर मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करत युवकांना आवाहन केले होते. यास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत २२७ बॅगचे संकलन करण्यात आले.

इंदापूर मधील सोनाई बजाज या शोरूम हे शिबीर आयोजीत केले होते. यात २२७ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला. संपुर्ण राज्यत सध्या रक्ताचा तुटवडा असून ग्रामीण भागातही काही वेगळी परिस्थिती काही वेगळी नाही. या तुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला रक्तदान करून ही तूट भरून काढण्याचे आव्हान काही दिवसांपूर्वीच केले, व यातून सर्वत्रच सूज्ञ नागरिक रक्तदान देखील करत आहेत. विविध ठिकाणी विविध संस्था, संघटना यांच्यावतीने रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत.

नेहमीच सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेणाऱ्या इंदापूरमधील सोनाई प्रतिष्ठान व जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबिर आज इंदापूर मधील सोनाई बजाज येथे संपन्न झाले. यात संकलन करण्यात आलेल्या बॅग महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी गरज असेन तिथे पाठविण्यात येणार असून रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना भविष्यात कधीही रक्ताची गरज पडली तर ते त्यांना या रक्तपेढी मार्फ़त मोफत मिळणार असल्याची माहिती प्रवीण माने यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button