?️अमळनेर कट्टा…खेडीच्या सरपंचपदी सौ आशाबाई पाटील तर उपसरपंचपदी सौ शोभाबाई पाटील यांची निवड……
अमळनेर : तालुक्यातील खेडी खुर्द व सीम प्रज गृप ग्रामपंचायतीवर सरपंचपदी सौ आशाबाई ज्ञानदेव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली असून उपसरपंचपदी सौ शोभाबाई भास्कर पाटील यांची निवड करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी जे देसले यांनी कामकाज पाहिले.
यावेळी निवडुन आलेले सदस्य प्रा ज्ञानदेव पाटील,हिरालाल पवार,सौ मंगल पाटील सौ मनीषा पाटील,दिपक भिल उपस्थित होते. सदर निवडीच्या वेळेस गावातील सिताराम डी पाटील, हिंमतराव पाटील, किसनराव पाटील, तानाजी पाटील, नामदेव पाटील,पितांबर पाटील,शामराव पाटील,यशवंत पाटील, बळवंत पाटील,भास्कर पाटील,चंद्रकांत पाटील,भारत टेलर आबा पाटील, रघुनाथ पाटील, गणेश पाटील,विलास शिंदे,नागो चव्हाण, प्रबोधन पवार,शामकांत पाटील, विलास शिरसाठ रवींद्र पाटील,मगन पाटील, उत्तमराव पवार,अनिल पाटील, किरण पाटील,कैलास पाटील, दगडू पाटील,भगवान पाटील, दिलीप पाटील,प्रा जिजाबराव पाटील, इंजी.प्रशांत पाटील, संतोष पाटील, विकास पाटील,सागर पाटील,उपस्थित होते. त्यांच्या या निवडीनिमित्त आमदार अनिल पाटील, जि प सदस्य जयश्री पाटील, पं.स.सदस्य प्रविण पाटील यांनी अभिनंदन केले.







