Amalner

?️ अमळनेर कट्टा…अमळनेर नागरपरिषदेचा सावळा कारभार… ऑफिस ला कुलूप कर्मचारी बेपत्ता

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर नागरपरिषदेचा सावळा कारभार ऑफिस ला कुलूप कर्मचारी बेपत्ता
योगेश पवार अमळनेर
अमळनेर : राज्यात सध्या कोरोनाचे सावट असल्याने बँक व बाजारात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली असल्याने सकाळी 11 च्या आत नागरिकांना आपली खरेदी व काम करण्यासाठी एकच धावपळ उडत असतांना अमळनेर नागरपरिषदेतील अर्ज व फॉर्म विक्री विभागाचे कर्मचारी सौ.उपासनी मॅडम 10:30 ला हजर झाले ऑफिस चा टाईम हा 9:45 असून देखील वेळेवर कर्मचारी हजर नसल्याने ही परिस्थिती रोजची असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सदरील बाब म्हणजे जन्म मृत्यू नोंद ज्या ठिकाणी होते तेथील एकही कर्मचारी हजर नव्हते
त्यात नागरिकांना कामास उशीर झाल्यास पोलिसांच्या व नागरपरिषद यांच्या कारवाई ला देखील त्याच नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.अमळनेर नागरपरिषदेवर कोणत्याही अधिकारीचे नियंत्रण नसल्याने तेथील कर्मचारी मनसोक्त पटेल तेव्हा येतात व पटेल तेव्हा जातात याची विचारणा देखील कुणी करत नाही. विशेष म्हणजे कोरोना काळात दिव्यांग विभागात दिव्यांगांचे प्रश्न व त्यांना लागणारी माहिती देण्यासाठी देखील एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याने दिव्यांगांचे देखील तेव्हढेच हाल होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button