Kolhapur

पर्यावरण वाचवा संदेश देत अथर्व गोंधळीने केला टोप संभापुर ते बेळगाव व बेळगाव ते परत टोप संभापुर सायकल प्रवास

पर्यावरण वाचवा संदेश देत अथर्व गोंधळीने केला टोप संभापुर ते बेळगाव व बेळगाव ते परत टोप संभापुर सायकल प्रवास

अनिल पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : टोप संभापुर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील 14 वर्षीय नववीत शिकणाऱ्या अथर्व गोंधळी याने 245 किलोमीटरचा सायकल प्रवास अवघ्या 10 तासात पूर्ण केला आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून अथर्व हा सायकल व अन्य खेळाचे धडे त्याची आई ,वडील व शालेय शिक्षकांकडून घेत आहे. अथर्व वयाच्या सातव्या वर्षांपासून सराव करत आलेला आहे. लहानपणापासूनच खूप जिद्दी आणि मेहनती असलेला हा अथर्व वयाच्या 11 व्या वर्षी सहावीत असताना ज्यूदो कराटे मध्ये ब्लॅक बेस्ट झाला आहे.
अथर्वने लहानपणापासूनच विविध खेळामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश मिळविले आहे. 2018 मध्ये त्याने पाच सुवर्णपदके आणि तीन रौप्य पदक ताय क्वांनदोमध्ये पटकाविले आहेत. आता त्याचा सायकलिंग मध्ये विश्वविक्रम करण्याचा मानस आहे. लहानपणापासूनच सायकलिंगची आवड अथर्वला आहे तो शाळेला दररोज दहा किलोमीटर प्रवास आपल्या सायकल वरून सध्या करत आहे यापूर्वी त्याने पन्हाळा ,ज्योतिबा, कासेगाव ,आष्टा ,शंकेश्वर ,बेळगाव, कराड आदी भागात सायकलचा प्रवास करत सायकल वापरा शरीर तंदुरुस्त ठेवा, निरोगी रहा, प्रदूषण टाळा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, असा संदेश दिला आहे.
हा प्रवास त्याने नॉन गीअर सायकलवरूनच केला आहे.
पेठवडगाव येथील होली मदर इंग्रजी माध्यम शाळेत शिकणारा अथर्व दररोज 170 किलोमीटर सायकल सराव करत आहे. आठवीत असताना त्यांने आपल्या वडीलांकडे गिअर सायकलची मागणी केली होती त्यावेळी त्याच्या वडिलांनी ज्योतिबा डोंगर दहा फेऱ्या मारण्याचे आव्हान त्यांस दिले होते हा खडतर प्रवास त्याने एक महिन्यात पूर्ण करून आपल्या वडिलांकडून गिअरची सायकल मिळावली असल्याचे वडील संदीप गोंधळी यांने सांगितले आहे.
या सर्वासाठी अथर्वचे आई-वडील खूप परिश्रम घेत आहेत आता केवळ विश्वविक्रम करण्याचा माझा मानस असल्याचे अथर्वने बोलून दाखविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button