पिंपळे येथिल ट्रान्सफार्मरच्या अडचणीमुळे शेतकऱ्याची लांबली कापूस लागवड
वीज कंपनीचे दुर्लक्ष
अमळनेर प्रतिनिधी : रजनीकांत पाटील
गेल्या तीन महिन्यापासून ब्रेकडाऊन झालेल्या वीज रोहित्रामुळे पिंपळे येथील शेतकऱ्यांची कापसाची लावणी थांबली असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र वीज कंपनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.
पिंपळे येथे तीन महिन्यापूर्वी गारपीट व वादळी पावसामुळे अनेक विजेचे पोल पडून जमीनदोस्त झाले होते व रोहीत्र व तारा तुटून पडल्या होत्या.
महावितरणने पिंपळे येथील शेतक-यांना आजपर्यत फक्त आश्वासन दिल. मात्र काम केले नाही त्यामुळे विहिरीत पाणी असूनही येथील शेतक-यांना कापसाचा उतारा करता आला नाही.
जास्त दिवसाचे कापूस बियाणे लावण्यापासून येथील शेतकरी वंचित राहून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तसेच पाऊस सुरू झाला तरी शेतात तारा पडून असल्याने त्यांना त्यांना शेती तयार करता येत नाही.
रोहीत्र ब्रेकडाऊन आणि शासनाचे लॉकडाऊन यामुळे पिंपळे परिसरातील शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
अमळनेर प्रतिनिधी : गेल्या तीन महिन्यापासून ब्रेकडाऊन झालेल्या वीज रोहित्रामुळे पिंपळे येथील शेतकऱ्यांची कापसाची लावणी थांबली असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र वीज कंपनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.