सहायक गटविकास अधिकारी झोपलेले..गलवाडे, झाडी,एकलहरे, भरवस,कलंबू येथील ग्रामपंचायती बंद…ग्रामसेवक, पोलीस पाटील,शिपाई गायब..शासनाचे नियम कचऱ्याचा डब्यात टाकत झोपा काढत आहेत पंचायत समिती चे कर्मचारी
सर्व ग्राम पंचायतींचा अत्यावस्श्यक सेवेत समावेश..
ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे गरजेचे…. जिल्हा परिषदेचा आदेश..

अमळनेर :कोरोना या भयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर आता यापुढे सर्व ग्राम पंचायतीचे कार्य अत्यावश्यक सेवेत गणले जाऊन त्यानुसार सर्व ग्राम सेवकांनी आपल्या मुख्यलयी राहावे असे जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेने दिलेल्या या पत्रात 14 वा वित्त आयोगाचा निधी हा कोरोना आजाराच्या जनजागृतीवर खर्च करावा असेही आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, अनेक ग्रामसेवक अमळनेर येथे राहत असून ग्रामीण भागात राहणे त्यांना जिकरीचे तर ग्रामस्थांना सोयीचे होणार आहे.

महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा,तालुका, ग्राम पातळीवर शासकीय, निमशासकीय कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. शहरी भागात महसूल,उपविभागीय, नगरपरिषद कर्मचारी,पोलीस प्रशासन सतत प्रयत्न करत आहेत. आणि 24 तास जनतेसाठी काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागाचा ठोस प्रहारच्या प्रतिनिधींनी मागोवा घेत गलवाडे,झाडी,भरवसा,एकलहरे इ गावात भेटी दिल्या आणि सामान्य जनतेला विश्वासात घेऊन समस्या जाणून घेतल्या.या सर्वेक्षणात सर्वात महत्त्वाची बाब निदर्शनास आली ती म्हणजे वरील सर्व ग्रामपंचायती बंद होत्या.कोणतेही शासनाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते.तर लोक प्रतिनिधींचा प्रश्नच उद्धभवत नाही. पंचायत समितीने आणि जिल्हा मुख्याधिकारी यांनी शासकीय आदेशानुसार ग्रामपंचायत जनतेच्या सोई साठी सुरू ठेवणे आवश्यक आहे. परंतु या आदेशाची सरळ सरळ पायमल्ली करत वरील सर्व ग्रामपंचायत बंद आढळून आल्या.

याशिवाय नागरिकांनी फवारणी,मास्क वाटप,आरोग्य विषयक जागरूकता याबाबतीत देखील अनेक तक्रारी केल्या. गावात दुकाने किंवा इतर व्यवहार जरी बंद असले तरी गावातील लोकां पर्यंत कोरोना विषाणू आणि त्याबद्दलची पूर्ण माहिती पोहचलेली दिसून आली नाही. या संसर्गजन्य आजाराचे दुष्परिणाम,गांभीर्य त्यांनासमजून सांगण्यात आले नाही. त्यामुळे सामान्य नागरिक संभ्रमात आहे.






