sawada

सावदा व परिसरात गोवंशाची वाहतूक व हत्या बंद व्हावी-बजरंग दलाची निवेदनाद्वारे मागणी

सावदा व परिसरात गोवंशाची वाहतूक व हत्या बंद व्हावी-बजरंग दलाची निवेदनाद्वारे मागणी

“महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा अस्तित्वात असून सुद्धा नेहमी वाहनाच्याद्वारे परराज्यातून आपल्याकडे अतिशय निर्दयपणे कोंबून बेकायदेशीर गोवंश येतात.यामुळे गोवंश तस्करीचा गोरख धंदा गुरांचे बाजाराचा गैरफायदा घेऊन रात्रदिवस गुपितरित्या सुरू असल्याची चर्चा नागरिकांतून ऐैकण्यास मिळते.मात्र याबाबत… मध्ये कमालीची अनभिज्ञता दिसून येते.व यामुळे … च्या कार्यपद्धतीवर देखील एका विशेष प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण होत असून तरी ठराविक प्रसंगी गोवंश रक्षकांच्या दृष्टीने जागृकता दाखवणे योग्य की अयोग्य?आणि बाकीचे दिवस जै थे… ”
—————————————-

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा व परिसरात होणारी गोवंश वाहातूक व हत्या बंद करण्यात यावी.अशी मागणी निवेदनाद्वारे बकरी ईद निमित्त सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय देविदास इंगोले यांच्या कडे येथील बजरंग दलाचे पद अधिकाऱ्यांनी आज दि.९ जुलै २०२२ रोजी केली आहे.

सध्या दि.१० जुलै रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी येत असून यानिमित्ताने सावदा व परिसरात गोवंश हत्या सुरू आहे. तसेच बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होण्याची शक्यता आहे.तरी महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू असून त्याची अंमलबजावणी हो‌वून आवश्यक उपायोजना करून यावर तातडीने कार्यवाही करणेकामी एपीआय देविदास इंगोले यांना निवेदन देण्यात आले आहे.याप्रसंगी सावदा येथील प्रतीक संतोष भिडे उर्फ (विक्की भिडे)जिल्हा संयोजक बजरंग दल भुसावळ जिल्हा,भाजपा शहराध्यक्ष जे.के भारंबे,पंकज परदेशी,राहुल वाणी,वैभव वाघुळदे,किरण सरोदे,हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button