?️ अमळनेर कट्टा… अमळनेर प्रतिनिधी खान्देशातील चारधाम यात्रा आयोजकांना येणाऱ्या अडी अडचणीबाबत नंदुरबार .धुळे . जळगाव विभागातील (खान्देश ग्रुप )यात्रा आयोजकांची अमळनेर येथे बैठक
अमळनेर : आज दि १९ रोजी गायत्री मंदिरावर संपन्न झाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हि बैठक प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आली
यावेळी बैठकीला शहादा धुळे मालपुर . मुकटी . कापडणे . तासखेडा . पारोळा . साक्री भडणे . शिरपुर . अमळनेर . जळगाव . येथील यात्रा आयोजकांची उपस्थीती होती सदर बैठकीत प्रत्येक यात्रेचे माहीती पत्रकामध्ये सर्वांचे रूट व तिर्थक्षेत्र (गावे )सारखे राहतील . त्यात प्रवासाचे भाडे सुद्धा सर्व तिन्ही जिल्ह्यातील यात्रा आंयोजकाचे सारखे राहतील . नेपाळ देशात किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी फारच अडचणी येतात म्हणुन त्या स्थळांचे खर्च हा प्रत्येक आयोजकांनी अधिक घ्यावा .यात्रा काळात वाहातूक पोलीस किंवा परिवहन अधिकारी यांच्या त्रासा विषयी चर्चा झाली तसेच सदर सर्व यात्रा ह्या भोजना सह असल्या मुळे गॅस सिंलेडर सोबत घेउन जाता यावे म्हणुन शासन दरबारी पाठपुरावा कसा करता येईल याविषयी सल्ला मसलत झाली . तसेच बरेच मंडळी जास्त करून ठराविक किर्तनकार मंडळीकमी पैशात यात्रा आयोजन करून लोकांची दिशाभुल करून यात्रेला नेतात पण रस्त्यात ही मंडळी यात्रेकरूंचे कसे हाल करतात त्या व्हिडीओ क्लिपा सर्व ग्रुप मध्ये मुद्देसुद रूपाने पुराव्या सह त्या व्हायरल करणे . किंवा त्याला सर्व ग्रुप मधील सदस्य त्याची भेट घेउन त्याची घरी किंवा किर्तन कार असेल तर त्याच ठिकाणी त्याला समज वजा सुचना देणे आणी ही मंडळी सदर यात्रेत अन्नदानाच्या नावाने ५ हजार . १० हजार . ११ हजार . आणी गावातुन अन्न धान्य पंगती च्या नावाने जमा करतात. यांची ही पैसे जमवण्याची पद्धतीस आळा कसा घालता येईल या विषयी सल्ला मसलत करण्यात आली . काही मंडळी पत्रीका मध्ये लिहीतात सदर यात्रा काढणे आमचा व्यवसाय नसुन सेवा आहे . अश्या आयोजकांना प्रत्येक यात्रा आयोजकांनी सेवा करण्यासाठी आमंत्रण देउन सेवेची संधी देण्याचे ठरले . तसेच लवकरच संघटना ही रजीस्टर करण्यासाठी सर्व एकमताने ठराव झाला . सदर बैठकीस जळगाव येथील श्री विलास देशपांडे . श्री रमेश कासार शिरपुर . श्री नंरेद्र (मून्ना) सोनार अमळनेर यांनी मार्ग दर्शन व बैठकीचे नियोजन केले . यावेळी विश्वास ठाकूर संजय पाटील बद्रीप्रसाद जाधव धूळे अश्विन गोसावी कापडणे राजेंद्र पाटील संजय चौधरी रमेश कूंभार पारोळा लोटन पाटील ईश्वर पाटील मूकटी राहूल भामरे मालपूर खूशाल परदेशी समिर गोसावी शहादा प्रदिप पाटील तासखेडा सूनिल सोनार रविंद्र चौधरी अमोल पाटील अमळनेर आदिंची ऊपस्थीती होती.







