Jalgaon

Jalgaon Live: लग्न लागले..नवरीचा गृहप्रवेश देखील झाला आणि घडला अनपेक्षित प्रकार..!

Jalgaon Live: लग्न लागले..नवरीचा गृहप्रवेश देखील झाला आणि घडला अनपेक्षित प्रकार..!

थाटामाटात लग्नसोहळा आटोपल्‍यानंतर घरातून नवरदेवासह त्याची आई व बहिणीचे दागिने चोरीला गेले. एकूण तीन लाख रुपये किंमतीचे दागिने लांबविल्याची घटना जळगावातील आदर्शनगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील आदर्श नगरातील श्रीश्री लॉन्स येथे पुनित वासुदेव मोतीरामाणी हे वास्तव्यास असून ते होजीअरी कपड्यांचे विक्रेता आहे. ७ फेब्रुवारीला त्यांचे लग्न होते. लग्‍न आटोपल्‍यानंतर ८ फेब्रुवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी रिसॉर्ट येथील रुममध्ये त्यांची आई कविता मोतीरामाणी यांनी त्यांचा सामान एका बॅगमध्ये भरला. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच नवरदेव आणि त्याची बहिणीजवळील सर्व दागिने त्यांनी एका प्लॅस्टीकचा लॉक असलेल्या कॅरीबॅगमध्ये ठेवले.

हॅण्डपर्समधून लांबविले दागिने

दागिने ठेवलेल कॅरीबॅग कविता मोतीरामाणी यांनी हॅण्डपर्समध्ये ठेवली. संपुर्ण सामान एका रुममध्ये ठेवून ते जेवणासाठी निघून गेले. पुनित मोतीरामाणी यांच्या पत्नीचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी आराम केला. सायंकाळी त्यांनी दागिने ठेवलेली पर्स उघडली असता, त्यांना त्यामध्ये ठेवलेली प्लॅस्टिकचा लॉक असलेली कॅरीबॅग व दागिने दिसून आले नाही. त्यांनी लग्नाठिकाणाहून आणलेल्या संपुर्ण सामानात दागिन्यांचा शोध घेतला मात्र तरी देखील त्यांना मिळून आले नाही. रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहे.

चोरीला गेलेला मुद्देमाल

चोरट्यांनी १२ हजारांची ६ ग्रॅम, ८ हजारांची ४ ग्रॅम, १८ हजारांची ९ ग्रॅम, ८ हजारांची ४ ग्रॅम, ८ हजारांची ४ ग्रॅम वजनाची अंगठी ७० हजारांचा ३८ ग्रॅम वजनाचा आर्टिफिशिअल डायमंड असलेला नेकलेस, ९५ हजारांचा सोन्याचा ५२ ग्रॅमचा नेकलेस, ५२ हजारांचे सोन्याचे २६ ग्रॅमचे मंगळसूत्र, १६ हजारांचे ८ ग्रॅम वजनाची चैन व २० हजारांचे १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण ३ लाख ७ हजारांचा ऐवज चोरट्याने लांबविला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button