Pune

उदयनराजेंचं योगदान काय?; राज्यसभा उमेदवारीवरून काकडे कडाडले

उदयनराजेंचं योगदान काय?; राज्यसभा उमेदवारीवरून काकडे कडाडले

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांचे नाव भाजपकडून निश्चित होण्याच्या मार्गावर असताना राज्यसभेचे दुसरे खासदार संजय काकडे यांनी त्याला उघडपणे विरोध केला आहे. उदयनराजे यांचे पक्षात काय योगदान आहे असे विचारत त्यांनी त्यांच्या नावाला आक्षेप नोंदवला आहे. इतक्यावर न थांबता उदयनराजे पक्षात आले आणि पडले. त्यांना त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आला नाही असा टोलाही काकडे यांनी लगावला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांचा भाजपच्या तिकिटावर काही दिवसांपूर्वीच पराभव झाला होता. त्यांचे पुनर्वसन करण्याचा विचार राज्यातील भाजप नेतृत्व करत असून त्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे. आता त्यावर भाजपच्या सहयोगी खासदारानेच टीका करत घराचा आहेर दिला आहे.

यावेळी काकडे म्हणाले की, ‘उदयनराजे फक्त भोसले आहेत म्हणून सरस होऊ शकत नाहीत. भारतातला मी एकमेव असा माणूस आहे की अपक्ष असतानाही निवडून आलो. ते छत्रपतीचे वंशज असले तरी आम्हीही महाराजांच्या सरदारांचे वंशज होतो असेही ते म्हणाले.
पुढे म्हणाले की, ‘मी स्वतः भारतीय जनता पक्षाचे दीड लाख सभासद नोंदवले आहेत. 2019 ची लोकसभा असो अथवा विधानसभा असो, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश मी पाळले.त्यामुळे राज्यसभा मलाच मिळेल मला फडणवीस डावलतील असं वाटतं नाही, डावलल्यावर बघू. परंतु माझ्यासाठी तेच मोदी आणि शहा आहेत असे असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button